Next
अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
BOI
Monday, July 15, 2019 | 10:43 AM
15 0 0
Share this article:

दहशतवाद्यांनी केलेल्या उरी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती; पण यात शांतपणे काम करीत बचावात्मक आक्रमणाचा म्हणजेच दहशतवाद्यांचा जेथे उगम होतो, तेथेच त्यांना नेस्तनाबूत करण्याचा सिद्धांत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मांडला आणि सीमेपलीकडे सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा हल्ल्यानंतरही त्यांची ही नीती यशस्वी ठरली. गुप्तहेर म्हणून काम केलेल्या डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. तेथे त्यांनी केलेली कामगिरी सर्वांच्या समोर आहे. अशा बहुपैलू व्यक्तिमत्त्वाच्या डोवाल यांचे चरित्र अविनाथ थोरात यांनी ‘अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ या पुस्तकातून मांडले आहे. यात काश्मीर प्रश्नाची ओळख करून देऊन डोवाल यांच्या ‘डिफेन्सिव्ह ऑफेन्स’ नीतीची यशोगाथा सांगितली आहे. त्यांचा पोलिस अधिकारी ते गुप्तहेर होण्यापर्यंतचा प्रवास, त्या काळातील कारकीर्द, गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात राहून सात वर्षे केलेली कामगिरी, ऑपरेशन ब्लॅक थंडर, कंदहार विमान अपहरण, ऑपरेशन दाऊद इब्राहिम, इशरत जहाँ प्रकरण यांमधील डोवाल यांच्या सहभागाबद्दल या पुस्तकातून सांगितले आहे.

पुस्तक : अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
लेखक : अविनाश थोरात
प्रकाशन : विश्वकर्मा प्रकाशन
पृष्ठे : ११०
मूल्य : १५० रुपये

(‘अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search