Next
विविध देशांच्या सैन्यदलांसह लष्कराचा पुण्यात युद्धसराव
BOI
Saturday, September 15, 2018 | 04:32 PM
15 0 0
Share this story


पुणे : परदेशातील सैन्यदलांसोबत सौहार्दपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, दहशतवादाशी झुंज देण्याकरिता सहकार्य वाढावे यासाठी भारतीय लष्कर अन्य देशांमधील सैन्याबरोबर सराव करत असते. सध्या पुण्यात औंध येथील लष्करी तळावर म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि नेपाळ या देशांच्या सैन्यदलांसोबत भारतीय लष्कर सराव करत आहे. 

या सरावादरम्यान शुक्रवारी (१५ सप्टेंबर २०१८) प्रत्येक देशाच्या पंचवीस जवानांनी एकत्र येऊन, गावात घुसलेल्या दहशतवाद्यांशी सामना करण्याचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये खुल्या मैदानात प्रतीकात्मक स्वरूपात गावाची रचना करण्यात आली होती. लष्कराच्या या तुकडीने येथील सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही इजा न होऊ देता, तिथे घुसलेल्या दहशतवाद्यांचा बीमोड करून, त्यांना शरण येण्यास भाग पाडले. जंगलामध्येही लपून बसलेल्या दहशतवाद्यांना कसे तोंड देता येईल, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 

१६ सप्टेंबरला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत या सराव शिबिराचा समारोप होणार आहे. पुणे हे भारतीय लष्कराचे दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) असून, येथे सराव करण्यास पोषक वातावरण आहे. यापूर्वी येथे भारत-चीन यांचा संयुक्त सराव झाला होता. तसेच बांग्लादेश, भूतान, म्यानमार येथे भारतीय लष्कराने संयुक्त सराव केला आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link