Next
गोयल गंगा स्कूलच्या सोनू गुप्ता यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
BOI
Wednesday, November 28, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

सोनू गुप्ता यांना पुरस्कार प्रदान करताना अबुधाबी  इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक नीरज भार्गव आणि हरमोसा मेडिकल सेंटरचे संस्थापक अब्दुल्ला अब्देलरहीम मोहम्मद अब्दुल्ला.

पुणे : गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता यांना नुकतेच ‘लीडरशिप-एक्सलन्स’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीमधील मेकाडेमिया संस्थेतर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या नेतृत्व कौशल्यातून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुप्ता यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

‘लीडरशिप-एक्सलन्स’ हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचा  पुरस्कार असून, शिक्षण क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवणाऱ्या मुख्याध्यापकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच त्यांचा यशस्वी वाटचालीतून इतरांना प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. 

‘सोनू गुप्ता यांचा गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा असून, त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे’, अशी भावना मुख्याध्यापिका भारती भागवाणी यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search