Next
पुण्यात उभे राहिले श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवन
BOI
Monday, April 08, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील ‘एमआयटी विश्वगशांती गुरूकूल’ आणि ‘एमआयटी आर्ट-डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजबाग येथे ‘श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवना’चा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

अखिल विश्वातील ज्ञानाचा सागर ज्यात सामावलेला आहे, तो ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता.  सहा एप्रिल, गुढीपाडव्याच्या दिवशी या श्रीमद्भगवद्गीता भवनाचे उद्घाटन झाले. 'एमआयटी'चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्यासह ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, पं. वसंतराव गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाच्या प्रवेशद्वाराशी दिव्य ज्ञान-यज्ञ कुंड उभारण्यात आले. या ज्ञानकुंडामध्ये सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी विश्वशांती प्रार्थना करून अग्नी प्रज्वलित केला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीमद्भगवद्गीता ज्ञान भवनाचे उद्घाटन करण्यात आले. 

ज्ञान विज्ञानाधिष्ठित वैश्वितक भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान, तसेत मानवता, सहिष्णूता, विश्वाशांती आणि ‘एकं सत विप्रा बहुधा वंदती’ व ‘वसुधैव कुटुंबकम’ असा संदेश देणाऱ्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वंर माऊली यांच्या विचारावर एमआयटी समुह चालत आहे. 

‘ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून संपूर्ण जगातील धर्मग्रंथ हे खऱ्या अर्थाने जीवनग्रंथ आहेत, हा विश्वसकल्याणाचा संदेश देणारे हे श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवन आहे. या ज्ञानभवनामुळे वैश्विक धर्माची व्याख्या पूर्ण झाली आहे’, असे मत विजय भटकर यांनी व्यक्त केले.

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search