Next
बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अनंत बजाज
प्रेस रिलीज
Thursday, May 24, 2018 | 02:31 PM
15 0 0
Share this article:

अनंत बजाज
मुंबई : बजाज इलेक्ट्रिकल्स लि.च्या संचालक मंडळाने सध्याचे ‘संयुक्त व्यवस्थापकीय संचालक’ अनंत बजाज यांना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केले आहे.अनंत बजाज यांनी १९९९ मध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये काम सुरू केले. पुण्याजवळ रांजणगाव येथे साडेचारशे दशलक्ष रुपये गुंतवणुकीचा हाय मास्ट उत्पादन व गॅल्व्हनायजिंग प्रकल्प उभारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांचे व्यवस्थापकीय कौशल्य, अनुभव यांची दखल घेऊन २००५ मध्ये त्यांना जनरल मॅनेजर, स्पेशल असाइन्मेंट म्हणून नियुक्त करण्यात आले.

त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज इंटरनॅशनल प्रा. लि. या निर्यातीतील कंपनीने आयटी व सोलार उत्पादने अशा वैविध्यपूर्ण व्यवसायांत यशस्वी प्रवेश केला. फेब्रुवारी २००६ मध्ये बजाज यांना, बजाज इलेक्ट्रिकल्स लि.च्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक म्हणून नेमण्यात आले.  एक एप्रिल २०११ रोजी त्यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

थेअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स (टीओसी) आणि रेंज अँड रिच एक्स्पान्शन प्रोग्रॅम (आरआरईपी) राबवण्यात अनंत बजाज यांचे मोलाचे योगदान होते. यामुळे कंपनीला जास्तीत जास्त वितरण व विस्तार यासाठीही मदत झाली आहे. या कार्यक्रमामुळे, कंपनी दर आठवड्याला ४४० जिल्ह्यांतील एक लाख ६०हजार रिटेल ग्राहकांना सेवा देते. अत्याधुनिक उपकरणे बनवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या ‘एबी स्क्वेअर’च्या स्थापनेमध्येही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी संपूर्ण कंपनीमध्ये आयओटी अॅनालिटिक्सचा समावेश केला. यामुळे उत्पादन विकासाला चालना मिळेल व उत्तम उत्पादने देता येतील, असा त्यांचा विश्वास आहे. २०१४ मध्ये  त्यांनी , त्यांनी  बी टू बी आणि बी टू सी  श्रेणीतील ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी ‘प्रोजेक्ट इव्हॉल्व्ह’ची सुरुवात केली.याबरोबरच, त्यांनी देशभरातील प्रमुख युवा-केंद्रित उपक्रमांशी भागीदारी करून देशतील तरुणांबरोबर कंपनीचा घट्ट सहयोग निर्माण केला आहे. सध्या, ते हिंद लॅम्प लि. व स्टरलाइट यांच्या संचालक मंडळातही आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search