Next
‘हेरिटेज वीक’निमित्ताने आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्तम चित्राविष्कार
BOI
Thursday, December 06 | 11:24 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : ‘हेरिटेज वीक’च्या निमित्ताने रत्नागिरीत २४ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतीय ऐतिहासिक स्मारके या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरातत्त्व विभाग आणि आर्ट सर्कल यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. थिबा पॅलेस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत रत्नागिरीतील शाळांमधील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नीलेश शिळकर सरांनी स्पर्धकांच्या चित्रांचे परीक्षण करून निकाल जाहीर केला. सविस्तर निकाल आणि विजेत्या विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे खाली दिली आहेत.

‘सर्व स्पर्धकांनी काढलेली चित्रे वाखाणण्याजोगी होती. इतिहास आणि ऐतिहासिक स्मारकांचे जतन आणि संवर्धन करण्याबद्दलचे नवीन पिढीचे विचार त्यांच्या चित्रांमधून प्रकट झाले आहेत,’ अशी भावना पुरातत्त्व विभागाचे रत्नागिरीतील समन्वयक ( तंत्र शाखा) ऋत्विज आपटे यांनी व्यक्त केली. सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांनी सर्व शाळा, कलाशिक्षक आणि आर्ट सर्कल या संस्थेचे आभार मानले. 

पहिला गट (इयत्ता पाचवी ते सातवी)

प्रथम क्रमांक : 
मानस संदीप पालकर, पाचवी (फाटक हायस्कूल, रत्नागिरी)



द्वितीय क्रमांक : 
सानिका राजेश लिंगायत, सातवी (फाटक हायस्कूल, रत्नागिरी)


तृतीय क्रमांक : 
ओंकार राजेश घवाळी, सातवी (नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूल)



उत्तेजनार्थ : 
वरुण योगेश वारसे, सातवी (फाटक हायस्कूल)



उत्तेजनार्थ :
तीर्था विजयानंद किनरे (फाटक हायस्कूल)


दुसरा गट आठवी ते दहावी
प्रथम क्रमांक :
आर्यन दीपक भारती, दहावी (फाटक हायस्कूल)



द्वितीय क्रमांक : 
दीक्षा राजेंद्र उतेकर, दहावी (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी)



तृतीय क्रमांक : 
हर्ष राजेंद्र कांबळे, दहावी (फाटक हायस्कूल)



उत्तेजनार्थ : 
शंतनू सुशील सावंत, नववी (जीजीपीएस गुरुकुल, रत्नागिरी)



उत्तेजनार्थ : 
तनिष मंगेश साळवी, आठवी (रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link