Next
‘आयएनआयएफडी’मधील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, April 22, 2019 | 05:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : डेक्कन येथील ‘आयएनआयएफडी’मधील विद्यार्थ्यांसाठी फेंग शुई या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. 

आजुबाजूच्या वातावरणाशी व्यक्‍तीची सुसंगतता साधण्यासाठी ऊर्जा शक्‍तीचा वापर करणारे फेंग शुई मूळचे चीनमधील शास्त्र आहे. याचा उगम पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. एखादी विशिष्‍ट खोली, घर, इमारत अथवा बगिचा यामधून ‘ची’ कशा पद्धतीने वाहते याचा अभ्‍यास करून समृद्धी, चांगले आरोग्‍य, समाधान आणि सुख मिळवून देण्याचा फेंग शुई प्रयत्‍न करते. फेंग शुईनुसार यिन ही स्‍त्रीशक्‍ती असून, ती निष्‍क्रिय ऊर्जा आहे आणि यांग ही पुरुषशक्‍ती असून ती गरम आहे. पर्यावरणाबरोबरच जल, अग्‍नि, लाकूड, धातू आणि पृथ्‍वी या पाच घटकांचाही विचार यात केला जातो. दिशादर्शक यंत्रावर दाखविलेल्‍या उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्‍नेय, दक्षिण, नैऋत्‍य, पश्चिम आणि वायव्य या आठ वेगवेगळ्या दिशांनाही महत्त्व आहे.  

एखाद्या इमारतीचे स्‍थान, बांधणी आणि वास्‍तुशास्‍त्रीय वैशिष्‍ट्ये ठरविण्यासाठी आणि फर्निचरची शैली आणि स्‍थान, रंग आणि सजावट तसेच बागिचा, रस्‍ते आणि इतर बाह्य घटक ठरवण्यासाठी फेंग शुईचा वापर केला जाऊ शकतो. अधिक आनंददायक वातावरण तयार करून, कुटुंबातील संवाद सुधारण्याचे, कर्मचार्‍यांच्या सहकार्याची पुनर्‍स्थापना आणि एखाद्या स्‍टोअरमधील विक्रीमध्ये वाढ याचे श्रेय फेंग शुईला दिले गेले आहे. केवळ चिनी किंवा आशियाई पद्धतीच्या, इमारत किंवा सजावटीच्या कोणत्याही शैलीसाठी या सिद्धांतांचा वापर करता येतो. या कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी चीनमधून भारतामध्ये आलेल्‍या या ऊर्जाशक्‍तीच्या प्राचीन रहस्‍याला पाहून अचंबित झाले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search