Next
५२ वर्षीय महिलेला ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून तिळे
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 03:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : औंध येथील साईश्री हॉस्पिटलमध्ये ५२ वर्षीय महिलेने ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून तिळ्यांना जन्म दिला आहे. या महिला मुळच्या पुण्याच्या आहेत. ५२ वर्षीय महिलेला ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून तिळे जन्माला येण्याची ही दुर्मिळ घटना आहे.

साईश्री हॉस्पिटलच्या आयव्हीएफ सेंटरमध्ये या तीन बाळांचा जन्म झाला असून, यामध्ये दोन मुले व एक मुलगी आहे. जन्माच्या वेळी यातील एका बाळाची स्थिती नाजूक होती; मात्र आता तिन्ही बाळांची स्थिती उत्तम आहे. गायकवाड दाम्पत्याला हैदराबाद व पुण्यात ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून अनेक वेळा गर्भधारणेचा प्रयत्न करूनही अपयश आल्याने त्यांचा या वेळेचा प्रवास अतिशय खडतर होता. ‘आयव्हीएफ’च्या मध्यमातून गर्भधारणेमध्ये तीन गर्भ वाढवणे अतिशय धोक्याचे ठरू शकते. गर्भाच्या उत्तम वाढीसाठी एक किंवा दोन चांगले गर्भ गर्भाशयामध्ये ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला होता; मात्र गायकवाड दाम्पत्याने आपले तिन्ही गर्भ वाढवण्याचा निर्णय घेतला.
 
या बद्दल बोलताना साईश्री हॉस्पिटलमधील ‘आयव्हीएफ’ तज्ञ डॉ. गिरीश पोटे म्हणाले, ‘या महिला ५२ वर्षाच्या असूनही त्यांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून तीळे यशस्वीरित्या जन्माला येणे सोपे होऊ शकले. आमच्या ‘आयव्हीएफ’ सेंटरमध्ये उत्कृष्ट टीम कार्यरत आहे. येथे रुग्णांना प्रगत उपचार आणि उत्तम सुविधा प्रदान केली जाते. मला सांगण्यास आनंद होत आहे की, डिसेंबर २०१८पर्यंत आमच्या ‘आयव्हीएफ’ सेंटरमध्ये १०१ बाळांचा जन्म झाला आहे.’

बाळांची आई म्हणाली, ‘साईश्री हॉस्पिटलच्या ‘आयव्हीएफ’ सेंटरमधून पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश मिळाले आणि तीन बाळांमुळे आमच्या कुटुंबात खरोखर आनंदी क्षण आला आहे.’

या ‘आयव्हीएफ’ सेंटरमधील डॉ. यशवंत माने व डॉ. गिरीश पोटे अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘साईश्री’चे ‘आयव्हीएफ’ सेंटर सुरू होऊन १६ महिने झाले असून, १६ महिन्यांत या सेंटरमध्ये १०१ बाळांचा जन्म झाला आहे. यामध्ये एक तिळे, २९ जुळे आणि ४० सिंगल बाळांनी जन्म घेतला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search