Next
‘एमजी मोटर’च्या ‘हेक्टर’चे गुजरातमधून उत्पादन सुरू
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 05:23 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर इंडियाने गुजरातमधील हालोलच्या अत्याधुनिक प्लांटमधून हेक्टरची पहिली विक्रीयोग्य आवृत्ती सादर केली. भारतातील विविध प्रकारच्या हवामानात एक दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची विस्तृत चाचणी घेतल्यानंतर ‘एमजी’च्या भारतातील पहिल्या कारचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले आहे. व्यापक लोकलायझेशन करून भारतीय ग्राहकांची पसंती आणि रस्त्यांच्या स्थितीनुसार ‘एमजी हेक्टर’मध्ये ३००हून अधिक बदल करण्यात आले आहेत.

५० शहरांतील ६५ शोरूम्सच्या आपल्या व्यापक नेटवर्कच्या पुरवठ्यासाठी एमजी मोटर इंडिया येत्या काही आठवड्यांत एमजी हेक्टर एसयूव्हीचे शिपमेंट करण्यास आरंभ करेल. या हेक्टर एसयूव्हीचे जागतिक पदार्पण १५ मे रोजी होणार आहे आणि ग्राहक जूनमध्ये या कारचे आगाऊ बुकिंग करू शकतील.

या विषयी बोलताना एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, ‘गुजरातमधील हालोल येथील आमच्या संपूर्ण नवीन असेम्ब्ली लाइनद्वारे एमजी हेक्टर या पहिल्या मेड इन इंडिया इंटरनेट कारचे उत्पादन सुरू करताना आम्हाला आनंद वाटत आहे. उच्च दर्जाची जागतिक निर्मिती मानके अंगिकारलेल्या हेक्टरला खास भारतीय ग्राहकांच्या पसंतीनुसार आणि रस्त्यांच्या स्थितीस अनुसरून कस्टमाइझ करण्यात आले आहे. एमजी हेक्टरद्वारे एसयूव्ही क्षेत्रात नवीन बेंचमार्क स्थापित करण्याचे आमचे लक्ष्य आहे.’

बहुप्रतीक्षित ‘एमजी हेक्टर’चे उत्पादन सुरू करण्यासाठी गुजरातमधील उत्पादन प्लांटच्या संपूर्ण नूतनीकरणासाठी ‘एमजी इंडिया’ने आत्तापर्यंत दोन हजार २०० कोटी रुपये गुंतवले आहेत. ‘एमजी’च्या या हालोल युनिटची क्षमता सध्या दर वर्षी ८० हजार गाड्यांची आहे. गरजेप्रमाणे ही क्षमता वाढवण्याची तरतूद या प्लांटमध्ये आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search