Next
‘हिंदाल्को’ने केले ‘एलरिस’चे अधिग्रहण
प्रेस रिलीज
Tuesday, July 31, 2018 | 11:32 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘हिंदाल्को’ या ‘नोव्हेलिस इन्क.’च्या उपकंपनीने ‘एलरिस कॉर्पोरेशन’ या जागतिक स्तरावरील ॲल्युमिनियम रोल्ड उत्पादक आणि युनायटेड स्टेट्समध्ये मुख्यालय असलेल्या कंपनीचे २.५८ बिलियनच्या डेट फायनान्सिंग पद्धतीने अधिग्रहण करार केल्याची घोषणा केली.

या वेळी बोलताना ‘हिंदाल्को’चे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला म्हणाले, ‘एका दशकापूर्वी ‘नोव्हालिस’च्या अधिग्रहणामुळे ‘हिंदाल्को’ने ॲल्युमिनियम बाजारपेठेत मोठी झेप घेतली.  यामुळे ‘हिंदाल्को’ ही जागतिक स्तरावरील बहुराष्ट्रीय कंपनी बनली व कंपनीमध्ये आंतराष्ट्रीय ग्राहक तसेच सर्वोत्कृष्ट अल्युमिनियमची मुल्यावर्धित उत्पादने देणारी कंपनी ठरली.  ‘नोव्हालिस’ने सातत्यपूर्ण वाढ नोंदवून जागतिक स्तरावरील आघाडी टिकवली. ‘एलरिस’चे अधिग्रहण हे आमच्या ॲल्युमिनियच्या मूल्यवर्धित उत्पादनाच्या वाढीच्या योजनेचा एक भाग आहे. यामुळे जगातील पहिल्या क्रमांकाची मूल्यवर्धित ॲल्युमिनियम कंपनी म्हणून आमचे स्थान अधिक मजबूत बनले आहे. या अधिग्रहणानंतर आम्ही आता संपूर्ण जगभरातील ऑटोमोटिव्ह आणि आता उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशा एअरोस्पेस क्षेत्राला सेवा देऊ शकू.   आता आमची पोहोच ही प्रमुख व वेगाने वाढणाऱ्या एशियन देशात पोहोचेल. यामुळे आता आम्हाला भारतातील अधिक चांगल्या जागतिक स्तरावरील सुविधा वाढवणे शक्य होऊन भारतीय ग्राहकांना जागतिक स्तरावरील उत्पादने देणे शक्य होईल.’

ऑगस्ट २००७मध्ये ‘हिंदाल्को’ने ‘नोव्हालिस’चे अधिग्रहण केल्यानंतर ‘नोव्हालिस’चा सातत्याने विस्तार झाला. ऑटोमोटिव्ह बाजारपेठेत वेगाने प्रसार करण्यासाठी, तसेच  पुर्नवापराचे योग्य मॉडेल निर्माण करत दक्षिण अमेरिका आणि आशियातील बाजारपेठेत भविष्यात वाढ नोंदवण्यावर त्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यामुळे ‘नोव्हालिस’ ही आज ॲल्युमिनियम मूल्यवर्धित उत्पादन क्षेत्रात आकाराने पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली असून, या अधिग्रहणामुळे ही वाढ उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून ऑटोमोटिव्ह आणि शीतपेयांची कॅन्स या विभागात कित्येक पटींनी नोंदवली आहे.’  

या अधिग्रहणामुळे उत्पादन शृंखला वाढून आता वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा एअरोस्पेस क्षेत्रातही कंपनीचा प्रवेश झाला आहे.  त्याचबरोबर सातत्याने क्षमता वाढवताना ‘हिंदाल्को’ आता बिल्डिंग आणि बांधकाम विभागातही स्पर्धात्मक झाली आहे.  ‘नोव्हेलिस’ची आशियासारख्या विकसित होणाऱ्या बाजारपेठेतील पोहोचही वाढली आहे. यामुळे थोड्या कालावधीत ‘नोव्हेलिस’ची वाढ विविध विभागात होऊ लागली असून, त्यामुळे आता ‘नोव्हालिस’च्या उत्पादन श्रेणीत वाढ होण्याबरोबरच विभाग व वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात वाढ करू शकली आहे.

‘एलरिस’च्या क्षमतांमध्ये दीर्घकालीन कंत्राटांमुळे वाढ झाली असून, यामध्ये ऑटोमोटिव्ह आणि एअरोस्पेससारख्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. जर्मनीतील कोब्लेंझ ही ‘एलरिस’च्या जागतिक संशोधन आणि विकासासाठी काम करत असून, जी गेल्या ५०हून अधिक वर्षांपासून त्यांच्याकडे उत्पादनांचे संशोधन व विकास करण्याची परंपरा आहे.  आता यूएसमधील कन्शॉमधील आर अँड डी सेंटर मिळाल्याने ‘नोव्हालिस’चे अलॉय आणि अन्य उत्पादन क्षमता ही भविष्यात पुढे राहण्यास सहयोग करेल.

‘एलरिस’च्या आधुनिक अशा‍ झिंगझियांग येथील केंद्राजवळ असल्याने ‘नोव्हालिस’ला आशियातही पाऊले रोवणे शक्य होणार आहे. यामुळे आता त्यांना एसएचएफईच्या (शांघाय फ्युचर्स एक्सचेंज) मेटल इंटिग्रेशनचा भाग होऊन जगभरातील ॲल्युमिनियम शीट पुरवठादारांमध्ये आघाडी मिळवण्याबरोबरच वेगाने वाढणाऱ्या अशा ऑटोमोटिव्ह बाजारपेठेला पुरवठा करणे शक्य होईल‍

या अधिग्रहणामुळे ‘हिंदाल्को’ला आता ॲल्युमिनियममधील मूल्यवर्धित उत्पादने भारतात आणणे शक्य होईल.  भारतीय ॲल्युमिनियम बाजारपेठ ही वाढीकडे प्रस्थान करत असताना प्रती व्यक्ती जीडीपी आणि ॲल्युमिनियमचा वापर देशात वाढत आहे. वाढीच्या या पहिल्या टप्प्याबरोबरच  ‘मेक इन इंडिया’मुळे बीअँडसी, वाहतूक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे पाहता ‘नोव्हेलिस’, ‘हिंदाल्को’ आता भारतातील आघाडीचे ॲल्युमिनियम उत्पादक ठरू शकता व भविष्यात वाढ करू शकतात. त्याचबरोबर या क्षेत्रातील ‘एलरिस’चे कौशल्य लाभल्याने ‘हिंदाल्को’च्या भारतातील ॲल्युमिनियम मूल्यवर्धित उत्पादनांना मागणी वाढू शकेल, तसेच ते भारतीय बाजारपेठेतील जागतिक खेळाडूंबरोबर चांगली स्पर्धा करू शकतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search