Next
परिते येथील भैरवनाथ यात्रेला प्रारंभ
BOI
Monday, February 18, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : परिते (ता. माढा) येथील भैरवनाथाच्या यात्रेला आजपासून (१८ फेब्रुवारी) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेसाठी गावात भक्तगणांची मांदियाळी जमली आहे.

सालाबादप्रमाणे याही वर्षी गावकरी व यात्रा पंच कमिटीने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. भल्या पहाटे भाविकांनी मंदिरात दंडवत घातला. त्यानंतर श्रींना अभिषेक व आकर्षक पोषाख चढवला. दिवसभर भाविकांनी मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी श्रींचा छबिना निघणार आहे. यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

‘हा देव नवसाला पावणारा असल्यामुळे सायंकाळी नवसाच्या शेरण्या वाटल्या जाणार असून, मंदिरावरून लहान बालकांना झेलण्यात येईल,’ अशी माहिती अजय पवार व उमेश पवार यांनी दिली. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search