Next
महात्मा गांधी शांतता संदेश यात्रेला प्रारंभ
BOI
Monday, October 02, 2017 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

महात्मा गांधी शांतता संदेश यात्रेचा शुभारंभ करताना पोलीस उपअधीक्षक महादेव वावळे. सोबत बापू शेठ व कार्यकर्तेरत्नागिरी : महात्मा गांधींच्या विचारांचे जतन होणे अत्यावश्यक असल्याचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी शांतता यात्रेचा शुभारंभ सोमवारी रत्नागिरीतून करण्यात आला. या वेळी पोलीस उपअधीक्षक महादेव वावळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.

या प्रसंगी महात्मा गांधी शांतता संदेश यात्रेचे तसेच गांधीवादी कार्यकर्ते मि. प्र. तथा बापू शेठ, चंद्रकांत घोसाळकर, राजाराम राऊत, प्रमोद जुवळे, प्रसाद हेंद्रे, सुरेश जयराम पवार आदी कार्यकर्त्यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

गांधीजींच्या सत्य, अहिंसा, शांती व बंधुभाव या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. त्यामुळे त्यांचे विचार, शिकवण यासंदर्भात पुन्हा जागरूकता निर्माण होणे गरजेचे असून ही जागरूकता संदेश महात्मा गांधी शांतता संदेश यात्रेद्वारे देण्यात येणार आहे. ही यात्रा महात्मा गांधीच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमापर्यंत जाणार आहे. येथेच या यात्रेचा समारोप होईल.

रत्नागिरीत या यात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा संगमेश्वर, साखरपा, मलकापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, चाळीसगाव, औरंगाबाद, जालना, वाशिम आणि वर्धा सेवाग्राम अशी मार्गक्रमणा करणार आहे.

‘या सर्व ठिकाणी असणाऱ्या पोलीस स्थानकांना यात्रा कमिटी भेट देणार आहे. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अतिशय महत्त्वपूर्ण काम करत असते. त्यामुळे या पोलीस स्थानकांना भेट देणात आहे,’ असे बापू शेठ यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search