Next
डिजिटल पेमेंटद्वारे खर्च करण्यात पुणे देशात अव्वल
व्यक्तिगणिक दरमहा खर्च अधिक असल्याचा निष्कर्ष
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 12:19 PM
15 0 0
Share this article:

पुणे : निश्चलनीकरणानंतर व यूपीआय यंत्रणा सादर झाल्यानंतर डिजिटल पेमेंटसाठीची मागणी दर वर्षी ७० टक्क्यांनी वाढते आहे. डिजिटल व्यवहार करण्यात चेन्नई, एनसीआर, पुणे व जयपूर ही शहरे देशात आघाडीवर असून, त्यातही पुणे हे अव्वल क्रमांकावर असल्याचा निष्कर्ष  रेझरपे या भारतातील पहिल्या एकत्रित पेमेंट सोल्यूशन कंपनीने ‘दी एरा ऑफ रायझिंग फिनटेक’ या अहवालात काढला आहे.

‘रेझरपे’ हिने ‘दी इरा ऑफ राइझिंग फिनटेक’ या अहवालाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन येथे केले. भारतात वेगाने वाढणाऱ्या फिनटेक इकोसिस्टीमचा सखोल अभ्यास या अहवालात करण्यात आला असून, या इकोसिस्टीमचा लघु व मध्यम उद्योगांवर (एसएमई) होणारा परिणामाचाही आढावा यात घेण्यात आला आहे. देशात डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या डिजिटल व्यवहारांच्या पद्धती, ऑनलाइन खर्च करण्याच्या लोकांच्या सवयी, यूपीआयचा प्रभाव आणि इतर नाविन्यपूर्ण औद्योगिक कल्पनांचे विश्लेषण या अहवालात नमूद आहे.

देशामध्ये येत्या २०२३ पर्यंत रोकडरहीत व्यवहारांचे प्रमाण वाढून ते रोख व्यवहारांपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे, असे हा अहवाल म्हणतो. सध्या, मोठ्या व मध्यम शहरांमधील लघुउद्योगांमध्ये रोकडरहीत व्यवहार करण्याचे प्रमाणे ७५ टक्क्यांनी व वेगात वाढले आहे.

पुण्यात डिजिटल पेमेंटची व्यवस्था कशा पद्धतीने विकसित झाली, याबाबत काही मनोरंजक निष्कर्ष ‘रेझरपे’ने अहवालात मांडले आहेत. प्रवास (२२.८ टक्के), ई-कॉमर्स (७.९ टक्के) आणि डिजिटल लेंडिंग (देव-घेव) (७.९ टक्के) या तीन क्षेत्रांमध्ये पुण्यात सर्वाधिक डिजिटल पेमेंट होतात. यातील डिजिटल लेंडिंग ही संकल्पना तुलनेने नवीन असून, येत्या पाच वर्षांत ती एक लाख कोटी डॉलर या स्तरापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. २०१८च्या उत्तरार्धात यूपीआय २.० लाँच करण्यामुळे मोठ्या व्यवहारांचे प्रमाण वाढले, इतकेच नाही, तर शहरात पीटूएम ही संकल्पनाही वाढली.

मर्चंट डिस्काउंट रेटमध्ये (एमडीआर) कपात झाल्यामुळे, तसेच सरकारतर्फे देण्यात आलेल्या ‘जीएसटी’मधील सवलतींमुळे, शहरातील व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंटची यंत्रणा स्वीकारली आहे. ई-एनएसीएच आणि यूपीआय यांसारख्या नवीन पेमेंट पद्धतींची स्वीकृती पुण्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. एकंदरीत, पुण्यात स्टार्टअप इकोसिस्टमच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे. यात गुंतवणूकदारांचे विविध गट, स्टार्टअप इनक्यूबेटर्स, तसेच प्रमुख व्यवसाय केंद्रांचा सहभाग आहे.

या विषयी बोलताना ‘रेझरपे’चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल माथूर म्हणाले, ‘यूपीआयच्या सादरीकरणानंतर आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने डिजिटल पेमेंट्सचे प्रमाण व्यवसाय वाढीपेक्षाही जास्त झाले आहे. यूपीआयमुळे डिजिटल पेमेंट्सवर आधीपासूनच एक मोठा प्रभाव होता, तो एका वर्षांत ९७२ टक्क्यांनी वाढला. फिनटेक इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्याचे सरकारचे व सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रयत्न, पारंपरिक व्यवसायांच्या मानसिकतेतील बदल आणि या डिजिटल पद्धतींवरील लोकांचा विश्वास, यांमुळे हे डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे व त्यास जास्त स्वीकृती मिळू लागली आहे.’

‘ई-एनसीएच/ई-मॅनडेट यांसारख्या गेम-चेंजर पद्धती, सुधारित मोबाइल तंत्रज्ञान, लघुउद्योगांसाठीची खास उत्पादने आणि सेवा, तसेच फिनटेक सेवा देणाऱ्या संस्था व बॅंका यांच्यातील सहकार्य, या गोष्टी घडून येतील, असा आमचा अंदाज आहे. पुण्यात विशेषत: कर्ज क्षेत्रामध्ये मोठ्या घडामोडी घडतील, असे आम्हाला वाटते. फिनटेक या तंत्रज्ञानामुळे भारतीयांचा खरेदी आणि विक्री करण्याचा मार्ग बदलत आहे आणि ‘रेझरपे’ या प्रक्रियेचा एक अमूल्य भाग असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे,’ असेही माथूर म्हणाले.

‘रेझरपे’च्या अंदाजानुसार, २०२०पर्यंत देशातील ४० टक्के डिजिटल पेमेंट व्यवहार हे मध्यम व छोट्या शहरांतील व्यावसायिक व ग्राहकांकडून होतील. तसेच इंटरनेट वापरणारे निम्मे नागरीक डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहार करतील. ‘रेझरपे’च्या अहवालातही २०२०पर्यंत भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) १५ टक्के भाग हा डिजिटल पेमेंटने व्यापला जाणार आहे, अशी अपेक्षा नमूद केली आहे. या अहवालातील सर्व निष्कर्ष जानेवारी २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीतील ‘रेझरपे’च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search