Next
‘डीकेटीई’मध्ये २१ एप्रिलला समुपदेशन
प्रेस रिलीज
Wednesday, April 18 | 03:00 PM
15 0 0
Share this story

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये २१ एप्रिलला पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सीईटी-२०१८’ व ‘इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रम या मधील उपलब्ध संधी’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (महाराष्ट्र राज्य, मुंबई) मे-२०१८ मध्ये प्रथम वर्ष पदवी इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश परीक्षेचे (MHT-CET-2018) आयोजन केलेले आहे. जे उमेदवार सीईटी परीक्षा देऊन शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांसाठी याबाबत इंटरनेटच्या माध्यमातून निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ‘डीकेटीई’ची प्रसारण केंद्र म्हणून निवड केलेली आहे. या कार्यक्रमास एमएचटी सीईटी नोंदणीकृत विदयार्थी व पालक उपस्थित राहू शकतात.

१० मे २०१८ रोजी राज्यभरात ‘सीईटी’ परीक्षा होणार आहेत.  या पार्श्‍वभूमीवर हे समुपदेशन विद्यार्थ्यांना फायदेशीर होणार आहे. ‘सीईटी’चे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते. ही प्रवेश प्रक्रिया बरीच क्लिष्ट असते. त्याचबरोबर नियमामध्ये वरच्यावर बदल होत असतात. बऱ्याच वेळा केवळ अज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा चांगल्या महाविद्यालयातील  प्रवेश हुकतो, असा अनुभव येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वंकष मार्गदर्शन या समुपदेशनाव्दारे करण्यात येणार आहे.  
 
‘इचलकरंजी व परिसरातील सर्व पदवी प्रवेशुच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा’, असे आवाहन ‘डीकेटीई’चे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संयोजक डीन म्हणून प्रा. डॉ. आर. एन. पाटील कार्यरत आहेत.

समुपदेशनाविषयी :
दिवस : २१ एप्रिल २०१८
वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी पाच
स्थळ : डीकेटीई टेक्स्टाईल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटचा ऑडिटोरियम हॉल, इचलकरंजी, कोल्हापूर.
अधिक माहितीसाठी संपर्क : आर.पी. पाटील- ९२७१६ २९९०५
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link