Next
ऑटो क्लस्टर येथे डिझाइन सेंटरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, March 26, 2019 | 04:05 PM
15 0 0
Share this article:पुणे : पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे शहरातील लघु व मध्यम उद्योजकांना गेली दहा वर्षांहून अधिक काळ विविध प्रशिक्षण सेवा पुरविणारे ऑटो क्लस्टर आता उद्योजकांसाठी प्रिंटिंग क्षेत्रातील अद्ययावत यंत्रणा घेऊन आले आहे. यामध्ये थ्रीडी प्रिंटिंग ‘एसएलए’ मशीन आणि ‘एफडीएम’ मशीन यांचा समावेश आहे. अद्ययावत अशा डिझाइन सेंटरचे उद्घाटनदेखील नुकतेच पिमाप्री येथील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले.

ऑटो कॅल्स्टर बोर्डचे सभासद आणि पिंपरी-चिंचवडचे सहशहर अभियंते प्रवीण तुपे, ऑटो कॅल्स्टर बोर्डचे सभासद आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर अर्थात ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य हे देखील या वेळी उपस्थित होते.

ऑटो क्लस्टर गेली १० वर्षे लघु व मध्यम उद्योगांना विविध प्रशिक्षण सेवा पुरवित आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक यंत्रसामग्री आपल्या सेवेत उपलब्ध करून देऊन जास्तीत जास्त लघु आणि माध्यम उद्योजकांना विकासाचे नवे मार्ग खुले करून देण्याचे ऑटो क्लस्टरचे ध्येय आहे. याकडेच वाटचाल करीत असताना आता थ्रीडी प्रिंटिंग ‘एसएलए’ मशीन आणि ‘एफडीएम’ मशीन या ठिकाणी उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या यंत्रणेमुळे उद्योजकांना प्रोडक्ट डिझाइन झाल्यानंतर त्याचा प्रोटोटाइप तयार करता येणार आहे. या यंत्रणेमुळे उद्योजकांचा प्रोटोटाइप करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्याचे प्रवीण तुपे यांनी या वेळी नमूद केले.   

याबरोबरच ऑटो क्लस्टरने विविध शैक्षणिक संस्थांशी संलग्न होऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खास डिझाइन सेंटरदेखील सुरू केले असून, याद्वारे संकल्पनांचे प्रमाणीकरण, विश्लेषण तसेच त्याची अनुकूलता सीएडी आणि सीएई या निकषांवर पडताळता येणार आहे. तसेच डिझाइनसंदर्भात सर्व प्रकारचे साह्यदेखील करता येणार आहे. यासाठी विविध यांत्रिकी क्षेत्रातील अनुभवी अभियंत्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आल्याची माहितीही या वेळी तुपे यांनी दिली.

‘सर्व लघु आणि माध्यम उद्योजकांना ऑटो क्लस्टर येथे उपलब्ध असलेल्या या सोयींचा आपला व्यवसाय विकसित करण्यासाठी शक्य तितका वापर करून घ्यावा,’ असे आवाहन या वेळी ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक वैद्य यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search