Next
पाटील विद्यालयात लोकवर्गणीतून बोअरवेल
BOI
Tuesday, July 23, 2019 | 12:38 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयाच्या प्रांगणात लोकवर्गणीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. 

रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई भासू लागली आहे. त्यातच रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयामधील बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे हाल होत होते. त्यामुळे सजग पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन विद्यालयामध्ये नवीन बोअरवेल खोदण्याचे ठरविले. यासाठी पालक-शिक्षक संघ, स्थानिक स्कूल कमिटी, सजग पालक व काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.

यामध्ये मुख्याध्यापक बी. यू. पाटील, पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील व शिक्षकांनी सुमारे दहा हजार रुपयांची मदत केली. निवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ यांनी पाच हजार रुपयांची मदत केली. पालक-शिक्षक संघ व काही सजग पालकांनी एकूण ४२ हजार रुपये खर्च केले. त्यातून प्रशालेच्या प्रांगणात नवीन बोअरवेल खोदण्यात आली. 

स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी व नारायण गायकवाड या तिघांनी या बोअरवेलसाठी लागणारा नवीन विद्युत पंप खरेदी करून दिला असल्याचे मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी सांगितले. 

गेल्या आठवड्यात या बोअरवेलमध्ये विद्युत पंप बसवून पाणी बाहेर काढण्यात आले. त्या वेळी जमलेले ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. या वेळी मुख्याध्यापक बी. यू. पाटील, पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील, सौ. लंकेश्वरी, संतोष रोकडे, अंकुश भोसले, संतोष लोखंडे, भारत गायकवाड, प्रदीप भोसले, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष जनक भोसले, अतुल भोसले, मोहन गिरी, आर. ए. व्यवहारे आदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या वेळी ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थांनी आनंद व्यक्त केला. 

या वेळी मुख्याध्यापक पाटील म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून आमच्या प्रशालेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे पालक -शिक्षक संघ, ग्रामस्थ व स्थानिक स्कूल कमिटीच्या पुढाकारातून प्रशालेच्या प्रांगणात नवीन बोअरवेलसाठी मोठी लोकवर्गणी जमा केली. नवीन बोअरवेलमधून पाणी येताच सर्वांनाच आनंद झाला.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 21 Days ago
An activity for others to follow . It is not expensive , is voluntary ,meets a dire need of the community . Best wishes .
0
0

Select Language
Share Link
 
Search