Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन
प्रेस रिलीज
Thursday, February 28, 2019 | 04:37 PM
15 0 0
Share this storyऔंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी राजभाषा दिवस २७ फेब्रुवारी २०१९ रोजी साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्यिक कवी, कथाकार बबन पोतदार आणि ज्येष्ठ कवयित्री जयश्री घुले उपस्थित होत्या.

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी भूषविले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. मयूर माळी, प्रा. वाघ, प्रा. कांबळे उपस्थित होते.या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोतदार यांनी मराठी भाषा प्रवाही स्वरूपाची भाषा असून, प्राचीन काळापासून आजपर्यंत तिने आपले अस्तित्व टिकवून ठेवले असल्याचे सांगितले. भाषेच्या उगमाविषयी आणि आजपर्यंत तिचा झालेला विकास यावर त्यांनी भाष्य केले; तसेच कविता, कथा कशी जन्माला येते या संदर्भात आणि कथेमधून समाजप्रबोधन कसे केले जाते या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ कवयित्री घुले यांनी कवितांचे गायन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्याला कविता कुठे आणि कशी भेटली, या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, ‘मराठी ही आपली मातृभाषा असल्याने, तिचे संवर्धन करणे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मराठी भाषेवर सातत्याने इतर भाषांची आक्रमणे झाली आहेत; परंतु तरीसुद्धा तिने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. इतर भाषेतील शब्द आत्मसात करून ते अधिकाधिक समृद्ध झालेली दिसते. आजपर्यंत मराठी भाषेने उर्दू, हिंदी, अरबी, फारसी, इंग्रजी भाषेतील शब्द आत्मसात करून ती अधिकाधिक समृद्ध आणि प्रवाही झालेले दिसते. त्यामुळे जागतिकीकरणाच्या युगातसुद्धा मराठी भाषा इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, चायनीज,  रशियन भाषेतील शब्द घेऊन अधिकाधिक समृद्ध होईल.’या प्रसंगी मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी ‘मराठी भाषा- काल, आज आणि उद्या कशी असेल’ या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सुदेश भालेराव, प्रज्ञा शिंदे, चंद्रकांत सोनवणे, मोहिनी खवळे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर, डॉ. अतुल चौरे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र जाधव याने केले. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. अतुल चौरे यांनी करून दिली. प्रियदर्शनी पारकर यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mrudula karni About 17 Days ago
Aapale sarvach karyakram suchit ya purn asatat.
0
0
पोतदार बबन About 18 Days ago
कार्यक्रम अप्रतिम झाला.
0
0

Select Language
Share Link