Next
सागरी जलतरण स्पर्धेसाठी ‘स्टारफिश’चे जलतरणपटू सज्ज
BOI
Saturday, December 15, 2018 | 11:21 AM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोठाणे : मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील चिवला बीचवर १६ डिसेंबर २०१८ रोजी सागरी हौशी जलतरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस अ‍ॅकॅडमीचे जलतरणपटू सहभागी होणार आहेत.

गतवर्षीच्या स्पर्धेतदेखील ‘स्टारफिश’च्या मयंक चाफेकर या जलतरणपटूने पाच किलोमीटरच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित फिरत्या चषकावर आपले नाव कोरले होते. यंदाही हा चषक पटकाविण्यासाठी सर्व जलतरणपटू गेल्या अनेक दिवसांपासून सरावासाठी मेहनत घेत आहेत. ही स्पर्धा पाच किमी, तीन किमी, दोन किमी, एक किमी आणि ५०० मीटर अशा विविध गटांत ही स्पर्धा होणार असून, या सर्व स्पर्धांमध्ये ‘स्टारफिश’चे जलतरणपटू सहभागी होणार आहेत. प्रशिक्षक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जलतरणपटू महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे कसून सराव करीत आहेत. यंदाही या स्पर्धेत ‘स्टारफिश’चे जलतरणपटू यशस्वी कामगिरी करतील, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.

या सर्व जलतरणपटूंना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी कोकण पदवीधर मंचाचे आमदार व ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी सर्व स्पर्धकांची भेट घेतली. या वेळी त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून सर्व स्पर्धक निश्चितच यशस्वी होतील आणि मालवणच्या किल्ल्यावर ‘स्टारफिश’चा झेंडा फडकवतील, असा विश्वास व्यक्त केला.

महापौर मिनाक्षी शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, स्टारफिश स्पोर्टस अ‍ॅकॅडमीच्या अध्यक्षा वैशाली नेरपगारे, सचिव मनोज कांबळे यांचे या स्पर्धकांना नेहमीच सहकार्य लाभते. या सर्वांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या असून, ‘स्टारफिश’चे सर्व जलतरणपटू ठाण्याचे नाव उज्ज्वल करतील,’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link