Next
‘सॅमसंग’तर्फे भारतात टीव्हीची नवी मॉडेल्स
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 05:40 PM
15 0 0
Share this storyमुंबई : सॅमसंग या भारतातील सर्वात विश्वासार्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने व सलग १३ वर्षे टेलिव्हिजन टेक्नालॉजीमध्ये आघाडीवर असलेल्या कंपनीने २०१८साठी पूर्णतः नव्या व आकर्षक टेलिव्हिजनचे नियोजन केल्याचे जाहीर केले. त्यामध्ये महत्त्वाच्या क्यूएलईडी, मिड-रेंज यूएचडी व मेक फॉर इंडिया ‘कॉन्सर्ट’ सीरिजमधील नव्या मॉडेलचा समावेश आहे.

‘सॅमसंग’ने भारतीय बाजारात विविध श्रेणींमध्ये महत्त्वपूर्ण उत्पादने दाखल केली आहेत. हा ब्रँड एलईडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही, कर्व्ह्ड टीव्ही, कर्व्ह्ड यूएचडी टीव्ही व आता क्यूएलईडी टीव्ही व द फ्रेम अशा बाजारातील पहिल्यावहिल्या नावीन्याच्या माध्यमातून नेहमी आघाडीवर राहिला आहे.

सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव भुतानी, ‘भारतातील ग्राहक मोठ्या आकाराचा आणि मोठ्या व उत्तम टेलिव्हिजनचा विचार करत आहेत. आम्ही यूएचडी लाइन-अपमध्ये 60% वाढ करून आणि नवी उत्पादने दाखल करून या ट्रेंडला चालना देत आहोत आणि अॅम्बिएंट मोड व दर्जेदार साउंड क्वालिटी अशी वैशिष्ट्ये असलेली नवी उत्पादने दाखल करत आहोत.’

‘आम्ही मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे संशोधन केले आणि ग्राहकांना त्यांच्या लिव्हिंग रूमसाठी केवळ टीव्हीपेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित असल्याचे आढळून आले. सॅमसंग क्यूएलईडी टीव्हीमधील अॅम्बिएंट मोडमुळे तो घराच्या अंतर्गत सजावटीचा एक भाग बनून जाईल. भारतातील टीव्ही ग्राहकांसाठी साउंड हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही आढळले आहे व त्यामुळे आम्ही कॉन्सर्ट सीरिज विकसित केली असून, ती उत्तम साउंड देण्याच्या दृष्टीने तयार केली आहे; तसेच यूएचडी सीरिजमध्ये अनेक प्रकारची नाविन्यपूर्ण व अपूर्व वैशिष्ट्ये आहेत,’ असे भूतानी यांनी नमूद केले.

क्यूएलईडी टीव्हीमध्ये, सॅमसंग अॅम्बिएंट मोड दाखल करत आहे. अॅम्बिएंट मोडमुळे क्यूएलईडी टीव्हीचे रूपांतर मूड व्यक्त करणाऱ्या कॅनव्हासमध्ये करता येऊ शकते. टीव्ही बेमालूमपणे भिंतीमध्ये मिसळून जाण्यासाठी आवश्यक असलेला व्हिज्युअल इफेक्ट निर्माण करण्यासाठी टीव्ही त्याच्या मागील भिंतीवर एक पॅटर्न तयार करू शकतो, तसेच टीव्ही आपोआप हवामान दर्शवतो व हवामान उन्हाळी किंवा पावसाळी किंवा बर्फाळ असल्याचे दाखवले जाते. त्याचप्रमाणे ग्राहक स्वतःचे फोटो किंवा आकर्षक कलाकृती वापरून बॅकग्राउंड हवी तशी ठेवू शकतो. क्यूएलईडी टीव्ही रिमोटवरील हॉटकी दाबून अॅम्बिएंट मोड वापरता येतो.

क्यूएलईडीमध्ये एक अदृष्य कनेक्शन असून, त्यामुळे एकेरी, जवळजवळ अदृष्य केबलमुळे तुम्हाला डेटा व पॉवर ट्रान्समिट करता येऊ शकते. सक्षम, वेगवान व भविष्यात्मक केबलमुळे जिथे हवा आहे तिथे टीव्ही ठेवता येऊ शकतो व सर्व कनेक्टेड उपकरणे टीव्हीपासून दूर ठेवता येऊ शकतात.

टलिजंट डिस्प्लेमध्ये टीव्ही नियंत्रित करण्याची बुद्धिवान पद्धत आहे. क्यूएलईडी टीव्हीमध्ये बटणांची गरज नाही व एस व्हॉइसद्वारे स्मार्ट पद्धतीने संवाद साधता येतो. एस व्हॉइसमुळे केवळ सूचनांद्वारे क्यूएलईडी टीव्ही नियंत्रित करता येऊ शकतो. क्यूएलईडी टीव्हीमध्येही स्मार्ट थिंग्स अॅप आहे, जे सिंक करणे व कंटेंट शेअर करणे, नोटिफिकेशन पाठवणे व स्क्रीन व साउंड यांचे प्रतिबिंब दर्शवणे यासाठी टीव्हीला अन्य आयओटी एनेबल्ड उपकरणांशी जोडू शकते. भारतात ५५ ते ७५ इंच आणि फ्लॅट व कर्व्ह्ड प्रकारची आठ क्यूएलईडी टीव्ही मॉडेल दाखल केली जाणार असून, क्यूएलईडी टीव्ही रेंज दोन लाख ४५ हजार रुपयांपासून सुरू होईल.

सॅमसंगच्या यूएचडी टीव्हीमध्ये स्लिम मॅट बॉडीमध्ये उत्तम पिक्चर क्वालिटी व आलिशान डिझाइन आहे. दर्जेदार हाय डायनॅमिक रेंजचे बळ असलेल्या, सॅमसंग यूएचडी टीव्हीचा ब्राइटनेस, काँट्रास्ट ठसठशीत आहे, उत्तम बारकावे आहेत व अचूक रंग आहेत; तसेच विस्तारलेल्या कलर स्पेक्ट्रमवरही रंग सुस्पष्ट दिसावेत, यासाठी हाय रिझोल्यूशन मिळण्यासाठी डायनॅमिक क्रिस्टल कलर तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला आहे. टू-वे ऑडिओ स्ट्रीमिंगचा आनंद घेण्याच्या हेतूने, स्मार्टफोन टीव्हीशी किंवा टीव्ही स्मार्टफोनशी किंवा टीव्ही ब्लुटूथ स्पीकरशी पेअर करण्यासाठी यूएचडी प्रकारामध्ये वन रिमोट कंट्रोल, स्मार्ट हब व स्मार्ट कन्व्हर्जन्स समाविष्ट आहे.
 
या नव्या उत्पादनांमुळे यूएचडी लाइन-अपमध्य १० मॉडेलवरून १६ मॉडेलपर्यंत वाढ केली जाणार आहे. एंट्री लेव्हल यूएचडीची सुरुवात ७१०० सीरिजवरून होईल व त्यानंतर ७४७०, ८००० व शेवटी फ्रेम असेल. यूएचडी टीव्ही रेंज ६४ हजार ९०० रुपयांपासून असेल.
 
‘मेक फॉर इंडिया’ नाविन्याचा भाग म्हणून, सॅमसंगने कॉन्सर्ट सीरिज स्मार्ट कॉन्सर्ट व जॉय कॉन्सर्ट या दोन प्रकारांमध्ये आणली आहे. टीव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी साउंड क्वालिटी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांना लाउड व्हॉल्युम व सिनेमॅटिक साउंड क्षमा अपेक्षित असते, जेणे करून त्यांना सिनेमा, संगीत व खेळ यांचा आनंद टीव्हीवर घेता येऊ शकतो. भारतीयांची साउंडविषयक गरज नव्या साउंड तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण करण्यासाठी कॉन्सर्ट सीरिजची निर्मिती केली असून, त्यामध्ये शक्तिशाली सिनेमॅटिक सराउंड ऑडिओ अनुभव देण्यासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील सुधारणांची सांगड घातली आहे.

कॉन्सर्ट सीरिजमध्ये दोन नाही, तर चार स्पीकर्स आहेत. दोन टॉपवर व दोन बॉटमला. एकत्रितपणे ४० वॅट सराउंड साउंड अनुभव देण्यासाठी प्रत्येक चॅनल १० वॅट साउंड आउटपुट देते.

स्मार्ट कॉन्सर्ट सीरिजमध्ये ब्लूटूथ क्षमता असून, त्यामुळे युजरना त्यांचा स्मार्टफोन किंवा स्पीकर टीव्हीशी पेअर करता येई व कस्टमेबल आधुनिक युजर इंटरफेस आहे. स्मार्ट कॉन्सर्ट प्रकारातील स्मार्ट हब वैशिष्ट्यामुळे युजरना लाइव्ह टीव्ही उपलब्ध होतो व जिओ सिनेमा, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, बिग फ्लिक्स अशा विविध अॅप्समध्ये कण्टेण्ट ब्राउज करता येतो. स्मार्ट कॉन्सर्ट व जॉय कॉन्सर्ट ३२ इंची, ४३ इंची व ४९ इंची या आकारांमध्ये आणि २७ हजार ५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.

जूनपासून सुरू होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर, सॅमसंगने मोठा स्क्रीन व प्रीमिअम टीव्ही घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ‘फील द गेम’ सवलत जाहीर केली आहे. २०१८ क्यूएलईडी टीव्हींच्या ग्राहकांना मोफत गॅलेक्सी एस नाइन व १० वर्षे नो स्क्रीन बर्न इन वॉरंटी दिली जाईल; तसेच, अन्य निवडक टीव्हीच्या खरेदीवर फ्री साउंडबार किंवा स्पीकर अशी बक्षीसे दिली जातील. ही सवलत भारतभर १५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link