Next
‘डीकेटीई’तील १६ विद्यार्थ्यांची वेलस्पन कंपनीत निवड
प्रेस रिलीज
Monday, June 03, 2019 | 04:17 PM
15 0 0
Share this article:

वेल्सपन कंपनीत निवड झालेले ‘डीकेटीई’चे विद्यार्थी.

इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल विभागातील तब्बल १६ विद्यार्थ्यांची वेलस्पन या इंडस्ट्रीमध्ये वापी, अंजार, पालगाव व सिल्व्हासा येथील युनिटसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे. 

वेलस्पन ही कंपनी टेरी टॉवेल, शिटिंग फॅब्रिक्स, नॉनवोव्हन फॅब्रिक्स, पॉलीस्टर/नायलॉन यार्न मॅन्युफॅक्चरिंग, यार्न डाइंग आदी विविध विभागांनी युक्त आहे. वेलस्पन ही वस्त्रोद्योगातील विख्यात अशी कंपनी असून, ती दर वर्षी ‘डीकेटीई’ला भेट देऊन विद्यार्थ्यांची निवड करते. याही वर्षी वेलस्पन कंपनीने रिटन टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यू अशा विविध फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता तपासली व एकूण १६ विद्यार्थ्यांचे कंपनीच्या विविध विभागांमध्ये प्लेसमेंट केले.

या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून प्रतिमा प्रमोद देशपांडे, विराज विजय म्हेत्रे, शुभम गोकुळचंद जैन, कृतिका हेमंत वर्मा, दीपक रामसुख कडवा, रवींद्र शहाजी लोनकर, शिवम सुनील म्हेत्रे, अफरीन सलीम गवंडी, साहील इम्तियाज जरडी, पूजा महेश गायकवाड, तृप्ती राजगोंडा पाटील, प्रसन्न चंद्रकांत मिठारी, राजू लिंगाप्पा कुंभोजे, शुभम सुभाष अकोळे, जावेद दस्तगीर गडडेकर, नेहा महेश हिरेमठ या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

यासाठी ‘डीकेटीई’च्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे ऑफिसर प्रा. एस. बी. अकिवाटे यांनी मेहनत घेतली. ‘डीकेटीई’चे चेअरमन कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search