Next
‘फ्रीडम फ्रॉम डायबेटिस’चा शोधनिबंध ‘एलिक्सिर’मध्ये प्रकाशित
प्रेस रिलीज
Thursday, December 20, 2018 | 11:24 AM
15 0 0
Share this article:

पुणे : एलिक्सिर इंटरनॅशनल जर्नल या आंतरराष्ट्रीय जर्नलने फ्रीडम फ्रॉम डायबिटीजच्या (एफएफडी) प्रोटोकॉलसह ‘रिव्हर्सल ऑफ मेटाबोलिक सिंड्रोम’वर शोधनिबंध प्रकाशित केले आहे.

मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजे शरीरात एकाच वेळी निर्माण झालेले विविध प्रकार. यामध्ये मुख्यत: वाढलेला रक्तदाब, वाढलेली साखरेची पातळी, कंबरेभोवती साठलेली अतिरिक्त चरबी आणि कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सच्या अनैसर्गिक पातळ्या यांचा समावेश आहे. या सर्व बिघडलेल्या गोष्टी शरीरात हृदयविकार, स्ट्रोक (लकवा) व डायबिटीस होण्याची शक्यता वाढवतात.

‘एफएफडी’ची जीवनशैली स्वेच्छेने आणि काटेकोरपणे अवलंबून मेटाबोलिक सिंड्रोमला परतवून लावणे नक्कीच शक्य आहे. या शोधनिबंधात ज्या केसस्टडीबद्दल माहिती दिली आहे, तो संपूर्ण बदल ‘एफएफडी’ आहारशैलीच्या अवलंबामुळे घडलेला आहे. या केसस्टडीचे प्रमुख मुद्दे  व्होल फूड प्लांट बेस्ड डाएट (डब्ल्यूएफपीडी) शाकाहाराबरोबर विविध प्रकारचे व्यायाम प्रकार आणि जीवनशैलीतील बदल हे आहेत. या सर्व गोष्टींना एकत्रितपणे अंमलात आणून मधुमेहावर मात केली आणि जीटीटी (ग्लुकोस टोलेरंस टेस्ट) पास केली. शरीरातील चरबी कमी केली आणि या सर्व उपायांनी या अत्यंत घातक मेटाबोलिक सिंड्रोम परतवून लावला.

एलिक्सिर इंटरनॅशनल जर्नलने या शोधनिबंधमध्ये एका ४५ वर्षीय पुरुषाचा वैद्यकीय इतिहास प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये चरबी, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि डायबिटीस मेलिटस यांचा समावेश आहे. हा माणूस या सर्व बिघडलेल्या गोष्टींवर कशी मात करतो आणि सगळ्या औषधांपासून कशी मुक्ती मिळवतो हे मेडिकल रिपोर्ट्सच्या सहाय्याने प्रमाणित केले आहे. ही केसस्टडी सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.

‘एफएफडी’ या संस्थेचे मुख्य कार्य डायबेटिस रिव्हर्सल आणि निरोगी कुटुंबांची निर्मिती आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी आहार, व्यायाम, आंतरिक परिवर्तन आणि मेडिकल अशा चार प्रणाल्या विकसित केल्या आहेत. या प्रणालींमुळे ‘एफएफडी’द्वारे पाच हजारांहून अधिक लोकांची डायबेटिसची औषधे आणि एक हजाराहून अधिक लोकांचे इन्सुलिन बंद झाले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search