Next
‘‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’’
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन
BOI
Monday, July 29, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ‘मोदी सरकारच्या कार्यकाळातील ही दुसरी ‘मन की बात’ होती आणि माझ्या असे लक्षात आले की लोक यातून खूप प्रभावित झाले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी झाली आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत घेतला. त्या वेळी ते बोलत होते. 


या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पुस्तकांविषयी चर्चा केली. जलसंरक्षण, जलसंचय, जलसिंचन, पाणी बचत याविषयीही चर्चा केली. कॅन्सरशी लढून जे जिंकले आणि खेळाडू बनले त्यांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. चांद्रयानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला; तसेच अंतराळ क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी एका स्पर्धेचीही घोषणा केली. 

स्वच्छतेप्रती पंतप्रधान नेहमी आग्रही असतात. लोकशाही मजबूत करणाऱ्या काश्मीरमधील यशस्वी पंचायत निवडणुकांविषयीही पंतप्रधान बोलले. अधिकारी कसे गावात जाऊन राहिले आणि त्यांनी लोकांच्या अडचणी कशा समजून घेतल्या तेही पंतप्रधानांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले. श्रावणाचा आनंद लुटण्याचे, तसेच १५ ऑगस्टला लोकोत्सव बनवण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी ‘मन की बात’ केले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search