Next
‘तनिष्क’ एक विश्वसनीय ब्रॅंड
प्रेस रिलीज
Wednesday, April 18 | 04:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : दागिन्यांच्या एकापेक्षा एक सरस डिझाइन्स, उत्तम ग्राहक सेवा आणि विश्वासार्हता यांमुळे ‘तनिष्क’ नेहमीच एक विश्वसनीय ब्रँड राहिला आहे. या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर कोणत्याही प्रकारचा दागिना विकत घेण्यासाठी ‘तनिष्क’च्या दालनाला आवर्जून भेट द्या.

‘तनिष्क’च्या प्रत्येक दालनात ठेवण्यात आलेला अत्याधुनिक कॅरटमीटर हाच सोन्याची शुद्धता मोजण्याचा सुयोग्य मार्ग आहे. ग्राहक घरी नेत असलेले सोने, जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपाचे आहे, याची ही हमी असते. इतकेच नव्हे, तर घडणावळदेखील केवळ आठ टक्क्यांपासून सुरू होत असून, आमची प्रादेशिक डिझाईन्स पाच ग्रॅमपासून सुरू होतात. ग्राहकांना जेव्हा-जेव्हा दागिने खरेदी करावेसे वाटतील, तेव्हा-तेव्हा ‘तनिष्क’च्या दागिन्यांवरच विश्वास ठेवावा, हीच यामागची भूमिका आहे.

हिऱ्यांचे दागिने घेताना ते हिरे पूर्णतः नैसर्गिक असतील या साठी ‘तनिष्क’ सर्वतोपरी काळजी घेतो; तसेच, आम्ही सतर्कतापूर्वक दृष्टिकोनातून आमचे हिरे निवडतो, जेणेकरून ग्राहकांना १० हजार रुपयांपासून शुद्ध व सर्वांत चमकदार हिरे देता येतील.

ग्राहकांनी दिलेले जुने सोने प्रत्येक दालनांत ग्राहकांच्या डोळ्यांदेखत वितळवले जाते आणि त्या सोन्यावर १०० टक्के एक्सचेंज मूल्य देण्याची हमीही ‘तनिष्क’कडून दिली जाते. जेव्हा ग्राहक हिरो, पोलकी, माणिक आणि पाचू एक्सचेंज करतात, तेव्हाही सुयोग्य बाजारभावानुसार १०० टक्के मूल्य (प्रचलित दरानुसार) देण्याची हमी ‘तनिष्क’तर्फे दिली जाते.

मूल्य आणि विश्वासार्हतेचा विषय येतो, तेव्हा ‘तनिष्क’मधून कोणत्याही प्रकारचे दागिने खरेदी करताना १०० टक्के मनःशांतीसह ग्राहक खरेदीचा आनंद लुटू शकतात. कारण, सुयोग्य भाव, सरकारी धोरणे आणि नियमांचे ‘तनिष्क’ पूर्ण प्रामाणिकपणे पालन करतो.

‘तनिष्क’च्या सर्वच उत्पादन उपक्रमांमध्ये पर्यावरणस्नेही प्रक्रियांचा वापर केला जात असून, यात कार्बन फूटप्रिंट, झिरो वेस्टेज, सक्षम जलवापर, सक्षम प्रक्रिया प्रकल्प तसेच, ऊर्जेचा पूनर्वापर आणि पवनऊर्जा व सौरऊर्जेद्वारे ऊर्जाबचत आदी पद्धतींचा समावेश आहे.

‘तनिष्क’सोबत डे ५०हून अधिक पारंपरिक दागिन्यांचे प्रकार घडवण्यासाठी दोन हजारांहून अधिक कुशल कारागीर कार्यरत असून, त्यांच्या अथक मेहनतीमुळे ‘तनिष्क’चा प्रत्येक पीस हा मास्टरपिस बनतो. म्हणूनच, ‘तनिष्क’ या कारागिरांना चांगली कार्यसंस्कृती आणि त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी उत्तम वातावरण देतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link