Next
‘सनदी लेखापालांमुळे ‘जीएसटी’ संकलनात मोठी वाढ’
‘सीजीएसटी’ आयुक्त कृष्णा मिश्रा यांचे प्रतिपादन
BOI
Monday, October 07, 2019 | 05:16 PM
15 1 0
Share this article:


पुणे : ‘वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठीच आणलेला आहे. त्यामध्ये सुधारणेला वाव असून, त्यासाठी जीएसटी कौन्सिल नियमित बैठक घेऊन ‘जीएसटी’ला ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘जीएसटी’मुळे कर संकलनात मोठी वाढ झाली आहे,’ असे प्रतिपादन ‘सीजीएसटी’च्या मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने ‘जीएसटी’वर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कोथरूड येथील ‘एमआयटी’च्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘सीजीएसटी’चे आयुक्त राजीव कपूर, ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अतुल गुप्ता, केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा ऋता चितळे, ‘आयसीएआय’चे सुशीलकुमार गोयल, राजेंद्र कुमार, यशवंत कासार, आनंद जाखोटिया, समीर लड्डा, अभिषेक धामणे, काशिनाथ पठारे, यशवंत कासार आदी मान्यवर उपस्थित होते. 

राजीव कपूर म्हणाले, ‘ऑनलाइन जीएसटी भरण्यात तक्रारी येत आहेत. त्यांना त्वरित मदत करणे गरजेचे आहे. ‘सब का विश्वास’ अंतर्गत अभियान सुरू आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जीएसटी भरणा करून करदात्यांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. बोगस जीएसटी बिल काढण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यांना पकडणे सहज शक्य आहे. प्रत्येकाला एकाच छत्राखाली घेऊन येणे खूप कठीण आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल; परंतु सर्व काही सुरळीत होईल.’

अतुल गुप्ता म्हणाले, ‘देशाच्या विकासात, तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांमध्ये मध्यस्थ म्हणून सीएची भूमिका महत्त्वाची आहे. सीएची गुणवत्ता अबाधित करण्यासाठी ‘आयसीएआय’कडून सतत उपक्रम राबविण्यात येतात. डिजिटल हब, युडीआयएन यासारखे व्यासपीठ उभारले आहेत. सीए आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा मेळ घालत अभ्यासक्रम अद्ययावत केला जात आहे. नियमित मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा घेण्यात येत आहेत. सीएचे काम, सेवा स्वयंचलीत आणि चांगली करण्यासाठी ‘आयसीएआय’ प्रयत्नशील आहे.’

‘जीएसटी’ अधिक सुलभ करण्यात सनदी लेखापाल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले. ऋता चितळे व अभिषेक धामणे यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. नेहा फडके, ऐश्वर्या गुंदेचा, पूजा महेश्वरी, राजश्री सहल यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ पठारे यांनी आभार मानले.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search