Next
पुण्यात ‘मिक्स द सिटी’ उपक्रम
प्रेस रिलीज
Monday, September 17, 2018 | 03:19 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ब्रिटिश कौन्सिल व स्माइलतर्फे (सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्युशन फॉर लेडीज एम्पॉवरमेंट) पुणेकरांसाठी ‘मिक्स द सिटी इन्स्टॉलेशन’ आणण्यात आले आहे. हा उपक्रम १७ ते २१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत विश्रामबागवाडा येथे सकाळी ११ ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

‘मिक्स द सिटी’ हे इंटरअ‍ॅक्टिव्ह म्युझिक प्लॅटफॉर्म असून, यामध्ये त्या त्या शहरातील संगीत, वाद्ये किंवा स्थळे याचे सादरीकरण व वापरकर्त्यांना अभिनव संगीत रचना निर्माण करून ऑनलाइन शेअर करता येते.

या उपक्रमात भारतातून प्रेरित झालेल्या संगीत, संस्कृती व कलात्मकतेचे सादरीकरण करण्यात येते. ‘मिक्स द सिटी’द्वारे भारतातील नवीन निर्माण होणारे संगीत व शास्त्रीय, लोकसंगीत, प्रादेशिक व समकालीन अशा वेगवेगळ्या संगीत शैलींचा मिलाफ प्रतिबिंबित होतो. हा उपक्रम ब्रिटिश कौन्सिल भारतात गेल्या दोन वर्षे राबवित असून, याद्वारे भारतातील संगीत क्षेत्रात असलेली विविधता जगभरातील सर्वांना प्रेरित करत आहे.
स्वत:चा साऊंड ट्रॅक निर्माण करण्यासाठी : www.mixthecity.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search