Next
खासगी एफएम वाहिन्यांवरही ऐकू येणार आकाशवाणीच्या बातम्या
खासगी वाहिन्यांना बातमीपत्रे सहक्षेपित करण्याची परवानगी
BOI
Tuesday, January 08, 2019 | 06:33 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ‘ऑल इंडिया रेडिओ’ अर्थात आकाशवाणीवरून प्रसारित होणारी बातमीपत्रे आता खासगी एफएम वाहिन्यांवरूनही सहक्षेपित होणार आहेत. जनजागृतीला प्राधान्य देत, केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मंगळवारी, आठ जानेवारी २०१९ रोजी या अभिनव उपक्रमाचा येथे प्रारंभ केला. या उपक्रमाबद्दल राज्यवर्धन राठोड यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

‘जनजागृतीला सरकारचे प्राधान्य असल्यामुळे ही सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा उपक्रम म्हणजे जनतेला माहिती देऊन शिक्षित आणि सबल करण्यासाठी देशातली सर्व रेडिओ केंद्र एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यासाठीचे एक पाऊल आहे’, असे राठोड म्हणाले.

‘सहयोगाच्या सध्याच्या काळात हा उपक्रम महत्वाचा आहे’, असे  प्रसारभारतीचे अध्यक्ष ए. सूर्या प्रकाश यांनी आपल्या संदेशात नमूद केले. 

माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती, पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक सितांशू कार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.


प्रायोगिक तत्वावर येत्या ३१ मे पर्यंत या बातम्या विनामूल्य सहक्षेपित करता येणार आहेत. विशिष्ट अटी आणि शर्तींचे पालन केल्यानंतर ऑल इंडिया रेडिओची इंग्लिश, हिंदी भाषेतली बातमीपत्र सूचीनुसार खासगी एफएम रेडिओ वाहिन्यांना सहक्षेपित करण्याची परवानगी मिळणार आहे. आकाशवाणीची बातमीपत्रे सहक्षेपित करण्यासाठी खासगी एफएम प्रसारकाला वृत्तसेवा वाहिनीच्या http://newsonair.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. आकाशवाणीची बातमीपत्रे कोणताही बदल न करता संपूर्णपणे सहक्षेपित करावी लागतील. त्याचबरोबर खासगी वाहिन्यांना या बातमीपत्रांसाठीचे योग्य ते क्रेडीट आकाशवाणीला द्यावे लागेल. खासगी वाहिन्या आकाशवाणीच्या बातमीपत्राच्या वेळेनुसार बातम्या सहक्षेपित करु शकतील  अथवा विलंबाने, मात्र ३० मिनीटांपेक्षा कमी अवधीच्या विलंबाने ही बातमीपत्रे प्रसारित करू शकतील. विलंबाने बातमीपत्र प्रसारित करत असल्यास तशा आशयाची उद्‌घोषणा आवश्यक राहील. अशी माहिती या वेळी देण्यात आली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search