मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘गावांचा शाश्वत सर्वांगीण विकास’ या विषयावर विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार १२ फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० ते रात्री आठ या वेळेत प्रसारित केली जाणार आहे.
यामध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे (व्हीएसटीएफ) व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर गायकवाड, अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम्, कार्यकारी संचालक उमाकांत दांगट व अभियानाच्या कार्यकारी संचालिका श्वेता शालिनी यांचा सहभाग आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे उद्दिष्ट व सद्य:स्थितीत सुरू असलेली कामे, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक ही संकल्पना, ग्राम सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न, अभियानामध्ये खासगी संस्थांचा सहभाग व योगदान, महिला सक्षमीकरण, शासकीय योजनांचे एकत्रिकरण आणि सर्वांच्या सहभागासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आदी विषयांची माहिती, कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी ‘जय महाराष्ट्र’ मधून दिली आहे.