Next
‘सूर्यदत्ता’चा ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट’सोबत सहयोग
प्रेस रिलीज
Tuesday, January 30 | 06:03 PM
15 0 0
Share this story

जागतिक दर्जाचे प्रमाणन असलेले तीन नवे अभ्यासक्रम देऊ करण्यासाठी ‘एससीएचएमटीटी’ आणि ‘अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’शी सहयोग केला आहे. या करारावर ‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन’चे अध्यक्ष व ‘एससीएचएमटीटी’चे शिक्षण अधिष्ठाता प्रा. डॉ.पुणे : सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमने (एससीएचएमटीटी) हॉस्पिटॅलिटी विषयातील दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण व व्यावसायिक प्रमाणन देण्यासाठी ‘अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, मिशिगन’समवेत (एएचएलईआय) सहयोग केल्याचे ‘एससीएचएमटीटी’चे शिक्षण अधिष्ठाता डॉ. संजय चोरडिया यांनी जाहीर केले आहे.

या सहयोगांतर्गत एक वर्षाचा शिक्षण व उद्योग समन्वय साधणारा आणि कमवा आणि शिका तत्त्वावरील कार्यक्रम ‘द स्टार्ट प्रोग्रॅम’, गेस्ट सर्व्हिस (अतिथी सेवा) विषयातील व्यावसायिक प्रमाणन कार्यक्रम ‘गेस्ट सर्व्हिस गोल्ड’ आणि सहा महिने ते एक वर्षाचा प्रमाणन कार्यक्रम ‘सर्टिफिकेशन प्रोग्रॅम’ हे अभ्यासक्रम असणार आहेत.  

यासंदर्भात ‘एएचएलईआय’चे विपणन विभागाचे संचालक डॅनी मॅथ्यूज म्हणाले, ‘स्टार्ट प्रोग्रॅम हा अशा स्वरूपाचा देशात उपलब्ध असलेला असा पहिलाच कार्यक्रम आहे, जो उद्योगाने मापदंड ठरवून दिलेला जागतिक कार्यक्रम असून, त्याच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्र व उद्योगाच्या कामकाजातील पोकळी भरून निघते. हा कार्यक्रम संपूर्णतः कौशल्यावर भर देणारा असून, प्रशिक्षित व कुशल कर्मचारीबळ विकासाच्या काळजीत असलेल्या उद्योगातील नेतृत्वासाठी सज्ज पर्याय आहे. भारतात आमच्या सहा प्रमुख शृंखला असून, अनेक संस्थांना या व्यावसायिक प्रमाणनातून प्रचंड फायदा झाला आहे. पुण्याच्या ‘सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम’शी सहयोग करार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यांच्या कँपसद्वारे आम्ही हा जागतिक दर्जाचा प्रमाणन कार्यक्रम देऊ करत आहोत.’

‘हा कार्यक्रम कौशल्य सुधारणा अभ्यासक्रम असून, ज्यांना आपले ज्ञान अद्ययावत करून अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणनासह नैपुण्य प्राप्त करण्याची इच्छा आहे अशा होतकरू हॉटेल व्यावसायिकांसाठीच नव्हे, तर प्रस्थापित हॉटेल व्यावसायिकांसाठीही आहे,’ असे डॉ. संजय चोरडिया म्हणाले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link