Next
मोहोळ येथे कृषी तंत्रज्ञान दिन उत्साहात
BOI
Monday, February 05 | 03:06 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : राहुरी (अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मोहोळ कृषी विज्ञान केंद्र आणि झुआरी अॅग्रो केमिकल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कृषी तंत्रज्ञान दिन व शिवार फेरीचे आयोजन केले होते. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बरबडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.  

या वेळी सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रतिनिधी पी. डी. पाटील, मोहोळ कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डी. डी. कदम, झुआरी अॅग्रो केमिकल्सचे श्री. लिंगाडे, सोलापूर विभागीय कृषि संशोधन केंद्रातील रोगशास्त्रज्ञ डॉ. डी. व्ही. ईंडी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री. शिनगारे, मोहोळ पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक उपायुक्त डॉ. धनंजय जगदाळे, नाबार्डचे नागेश कोकरे, मोहोळ तालुका कृषी अधिकारी भगवान सरडे, आढीव (पंढरपूर) येथील प्रगतशील शेतकरी भारत रानरुई उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावर शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान शेतकरी, महिला शेतकरी व युवक शेतकरी यांना ज्वारी, हरभरा, करडई, गहू, चारापिके (ओट, बरसीम, लसूण घास, जायंट बाजरा, ऑफ्रीकन टॉल) आदी पिकांचे विविध वाण व लागवड तंत्रज्ञान आदींबाबत विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) अजय दिघे व प्रक्षेत्र व्यवस्थापक नरेंद्र जाधव यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘कृषी तंत्रज्ञान दिन व शिवारफेरी याच्या नियोजनाबद्दल सांगतांना सोलापूर जिल्ह्यातील मुख्य पिकांचे विविध वाणांचे प्रात्यक्षिक तसेच चारा पिकांच्या वाणांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी पहावयास मिळतील आणि त्यांच्या तुलनात्मक अभ्यासास निश्चितच मार्गदर्शक ठरतील.’

बरबडे यांनी शेतकऱ्यांनी जमिनीच्या गुणवत्तेनुसार पिकांची निवड करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ‘प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावता येईल,’ असे मत व्यक्त करतानाचा त्यांनी  ‘आत्मा’द्वारे शेतकरी गट, महिला बचत गटांना योजनांविषयी माहिती दिली.

तांत्रिक सत्रात डॉ. डी. व्ही. ईंडी यांनी ऊस उत्पादनातील महत्वाच्या बाबी विषद केल्या त्यामध्ये आदर्श खोडवा व्यवस्थापनात अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाचटाचे व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. धनंजय जगदाळे यांनी जनावरांच्या आहारात खुराखाचे महत्त्व सांगून घरच्या घरी खुराक तयार करण्याचे तंत्र वापरून आहार व्यवस्थापन केल्यास खर्चात बचत करता येत असल्याचे सांगितले. भारत रानरुई यांनी द्राक्ष पिकात सेंद्रिय पद्धतीने कर्ब व्यवस्थापनाविषयी माहिती दिली; तसेच सेंद्रिय शेतीतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लोकांसमोर मांडला.

श्री. लिगाडे यांनी ‘झुआरी’द्वारे उत्पादित खतांची माहिती दिली. प्रा. कदम यांनी ज्वारीच्या विविध वाणाविषयी माहिती दिली. नागेश कोकरे यांनी कृषीपूरक उद्योग व महिला बचत गटांसाठी नाबार्डच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. दिनेश क्षीरसागर यांनी कृषी प्रक्रिया उद्योग व उद्योग उभारणीसाठी सहाय्यभूत शासकीय योजना विषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राच्या यशस्वी उद्योजकांद्वारे निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन भरवण्यात आले. यात प्रामुख्याने डाळिंबाची प्रक्रियायुक्त पदार्थ, सेंद्रिय गुळ उत्पादने, विविध कडधान्यांच्या डाळी आणि ज्वारीचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ यांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रामुख्याने महिला आर्थिक विकास महामंडळ आणि स्वयं शिक्षण प्रयोग, सोलापूर यांनी मोलाचे योगदान दिले.

विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान व दुग्धशास्त्र) डॉ. तानाजी वळकुंडे यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे अजय दिघे, काजल जाधव, नरेंद्र जाधव, सुयोग ठाकरे, संजय बनसोडे, ज्ञानेश्वर तांदळे, नितीन बागल, अरूण गांगोडे, शंकर सुतार यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
समिर कदम About 16 Days ago
बातमी खूपच छान आहे . बाईट्स ऑफ इंडियाने ती छान वापरल्याचे खरच कौतुक करावे असे वाटते . यानिमीताने मोहोळ कृषि विज्ञान केंद्राची ख्याती व इथे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती जगभर पोहोचली .
2
0

Select Language
Share Link