Next
अनुवादक होण्यासाठी तंत्र मंत्र, सराव, मेहनत महत्वाची
प्रेस रिलीज
Wednesday, May 02 | 06:07 PM
15 0 0
Share this story

अनुवाद क्षेत्राबाबत मार्गदर्शन करताना लीना सोहोनी आणि विक्रांत पांडे
पुणे : ‘एखाद्या पुस्तकाचा अनुवाद कसा करावा हे शिकवणं अवघड आहे. अनुवाद करणे शिकणं ही एक कला आहे. त्यासाठी साहित्याची आवड तर पाहिजेच परंतु त्यातील तंत्र मंत्र शिकणे, सराव आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर एक उत्कृष्ट अनुवादक होणं अवघड नाही’, असे मत प्रख्यात भाषांतरकारांनी व्यक्त केले.

असोसिएशन ऑफ लँग्वेज प्रोफेशनल्स आणि सिंबायोसिस संस्थेचे एसआयएफआयएल यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरव्यू सीरिजचे पुढचे सत्र ‘बिहाइंड द स्क्रीन इंटरव्यू सेशन दोन ’ चे आयोजन करण्यात आले होते. यात साहित्य क्षेत्रात नावाजलेले भाषांतरकार बडोद्याचे विक्रांत पांडे आणि पुण्याच्या लीना सोहोनी यांनी मार्गदर्शन केले. एसआयएफआयएलचे संचालक शिरीष सहस्रबुद्धे, उपसंचालक डॉ. वैशाली जुंद्रे, ललिता मराठे, केतकी नवाथे हे या वेळी उपस्थित होते. ललिता मराठे, केतकी नवाथे यांनी विक्रांत पांडे आणि लीना सोहोनी यांची मुलाखत घेतली. त्या वेळी या दोघांनी मनमोकळा संवाद साधला.

पांडे म्हणाले, ‘अनुवादक होण्यासाठी तुमच्याकडे चिकाटीची फार आवश्यकता असते. अनुवाद करताना तुम्ही ते एक टास्क म्हणून  स्वीकारावे लागते. कारण बऱ्याचवेळा ४०-५० पानांचा अनुवाद केल्यानंतर  कंटाळा येतो. 

सोहोनी म्हणाल्या, ‘अनुवाद करण्यासाठी तो लेखक पुस्तक लिहिताना काय विचार करत असेल, याचा विचार करावा  लागतो. अनेक वेळा संदर्भासाठी इतर अवांतर वाचनही करावे लागते. एक उत्कृष्ट अनुवादक होण्यासाठी बहुश्रुतता असणे आवश्यक असते. त्यासाठी दोन्ही भाषेतील वाचन आवश्यक आहे. अनुवाद करताना काही गोष्टी समजल्या नाहीत तर त्या विषयातील तज्ञांशी संपर्क करून त्या समजावून घ्यावा लागतात. याबरोबरच, अनुवादक होण्यासाठी भाषेवर, शब्दांवर आणि व्याकरणावर प्रभुत्व पाहिजे. भाषांतरकाराला अहंम बाजूला ठेवावा लागतो. कुठल्याही पुस्तकाचे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करताना अनुवादक मजकुर कमी किंवा जास्त करू शकत नाही. एखाद्या गोष्टीचा अर्थ बदलला तर त्याचे विश्लेषण करू शकतात, परंतु कुठल्याही परिस्थितीत भाषेचे किंवा शब्दांचे सौंदर्य आपल्या मताने वाढविता येत नाही.’

‘कविता आणि विनोद यांचा इंग्लिश भाषेमध्ये अनुवाद करणे अवघड असते. त्यामुळे भाषांतरकारला मर्यादा येतात. १०० टक्के अनुवाद करणे हे शक्य नसते. भाषांच्या मर्यादा असतात. काही भावना काही भाषेत शब्दांमध्ये व्यक्त करता येतात, तर दुसऱ्या भाषेत त्याचे विश्लेषण सांगावे लागते’,असे पांडे आणि सोहोनी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link