Next
एमजी मोटर इंडियातर्फे पाच भारतीय स्टार्ट अप्सची निवड
प्रेस रिलीज
Tuesday, December 12 | 05:42 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली :  ब्रिटिश कार उत्पादक कंपनी एमजी मोटरने (मोरिस गराजेस) कंपनीच्या वाहनउत्पादन व्यवसायात आणखी समन्वय आणण्यासाठी व त्या अनुषंगाने आवश्यक मूल्यांकन करण्यासाठी पाच भारतीय स्टार्ट अप्सची निवड केली आहे. या स्टार्टअप्समध्ये कार्लक्यू, स्टेराडियन सेमी, अल्टीग्रीन प्रोपल्शन लॅब्ज, एक्स्प्लोराइड आणि झुपर यांचा समावेश आहे.

एमजी मोटर इंडियाला ‘एमजी ड्राइव्ह्ज इनोव्हेशन’ उपक्रमासाठी वीस दिवसांत २०० प्रवेशिका मिळाल्या होत्या, ज्यामध्ये टेलिमॅटिक्स फील्डला सर्वाधिक म्हणजे १५ रेटिंग मिळाले होते. या क्षेत्रात मिळणाऱ्या इतर लोकप्रिय उपाययोजनांमध्ये ऑग्युमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी आणि मिक्स्ड रिअलिटी (एआर/व्हीआर/एमआर/) नऊ टक्क्यांवर आणि इलेक्ट्रिक वाहने आठ टक्क्यांवर आहेत.

‘इथल्या स्टार्ट अप्सकडून मांडल्या जाणाऱ्या संकल्पनांचे वैविध्य आणि दर्जा प्रोत्साहनकारक आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसादही जबरदस्त आहे. एमजीमध्ये आम्ही सातत्याने संशोधनास चालना देण्याची संस्कृती जोपासली आहे. भारतभरातील तरुण गटांकडून हार्डवेअर आणि उत्पादन संशोधन संकल्पना येताना पाहाणे उत्साहवर्धक आहे. या स्टार्ट अप्सची क्षमता आजमावण्यासाठी आम्ही उत्सुक असून त्याचा आमच्या व्यवसायाचे मूल्यवर्धन करण्यासाठी निश्चित फायदा होईल,’ असे मत एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, राजीव छाबा,  यांनी व्यक्त केले.

सर्वोत्तम ऑटो- टेक आणि मोबालिटी सोल्यूशन्स शोधण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी कंपनीने १६ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘एमजी ड्राइव्ह्ज इनोव्हेशन’ उपक्रम जाहीर केला. वाहन क्षेत्रातील जयंत देब, डॉ. पी. एस. नायर, डॉ. अनिल वाली, शैलेश विक्रम सिंग आणि पद्मजा रूपारेल या तज्ञांनी या पाच स्टार्ट अप्सची निवड केली आहे.१५ व १६ डिसेंबर रोजी दिल्लीतील टीकॉन येथील एमजी इनोव्हेशन लाउंजमध्ये या पाच स्टार्ट अप्सचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. त्याशिवाय कंपनी ‘मेंटरिंग गराज’ नावाचा उपक्रम राबवणार आहे, ज्यात या स्टार्ट अप्सना नेतृत्व गटाकडून आवश्यक सल्ला, अभिप्राय व उपाययोजनांचा लाभ होईल. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link