Next
शिवनेरीवर कांचनजुंगा मोहिमेला महाराष्ट्राचा ध्वजप्रदान
BOI
Tuesday, February 26, 2019 | 02:59 PM
15 0 0
Share this article:


पुणे : अग्रगण्य गिर्यारोहण संस्था गिरिप्रेमीच्या महत्त्वाकांक्षी ‘कांचनजुंगा मोहीम २०१९’चा भगवा ध्वजप्रदान कार्यक्रम ‘किल्ले शिवनेरी’ येथील शिवजन्मस्थळावर मोठ्या उत्साहात पार पडला. हावरे बिल्डर्स व इंजिनीअर्सचे व्यवस्थापकीय संचालक व श्री साई बाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते मोहिमेचे नेते उमेश झिरपे व इतर संघसदस्यांकडे महाराष्ट्राचा भगवा ध्वज प्रदान करण्यात आला. आता गिरिप्रेमीचे शिलेदार हा भगवा ध्वज भारताच्या तिरंगा ध्वजाच्या साथीने जगातील तिसरे उंच शिखर व भारतातील सर्वोच्च शिखर माउंट कांचनजुंगावर फडकवतील. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत व त्यांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज म्हणजे शौर्याचे प्रतिक. हेच शौर्याचे प्रतिक भारतातील सर्वोच्च शिखरावर फडकावून साहसाचे परमोच्च दर्शन घडविण्यासाठी गिरिप्रेमी सज्ज आहे. 


या वेळी गिरिप्रेमीच्या मोहिमेचे सदस्य व शेकडो हितचिंतक उपस्थित होते. भगवा ध्वज प्रदान करण्यासोबतच शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले; तसेच शिवाई देवीच्या मंदिरामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, घोड व भीमा या पाच पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला व मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना करण्यात आली.

या वेळी डॉ. हावरे म्हणाले, ‘गिरिप्रेमीने आजवर गिर्यारोहण क्षेत्रामध्ये नवनवा इतिहास घडविला आहे, तो असाच कायम राहणार आहे. कांचनजुंगा मोहीम इतर मोहिमांप्रमाणेच यशस्वी होणार आहे. गिरिप्रेमीच्या तमाम पाठीराख्यांच्या मनात शिखरावर ध्वज फडकला आहेच, आता फक्त प्रत्यक्षात तिरंग्यासह गिरिप्रेमीचे मावळे शिखर गाठणार व मोहीम संपूर्णपणे यशस्वी करून येणार याचा मला विश्वास आहे.’

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search