Next
‘स्टार प्रवाह’वर ‘देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
प्रेस रिलीज
Wednesday, September 05 | 04:59 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सुखी आयुष्याचा कानमंत्र देणाऱ्या ‘देवा’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ‘स्टार प्रवाह’वर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि लाखो मराठी युवकांचा स्टाइल आयकॉन अंकुश चौधरी या सिनेमातून देवाच्या रूपात भेटीला येणार आहे.

सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नऊ सप्टेंबरला दुपारी एक आणि सायंकाळी सात वाजता दाखविला जाणार आहे. ‘देवा- एक अतरंगी’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अंकुश या सिनेमात अतरंगी लूकमध्ये दिसेल. या चित्रपटात अंकुशसोबतच तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, डॉ. मोहन आगाशे, पॅडी कांबळे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

‘देवा’ सिनेमाच्या कथेला खूप वेगवेगळे आणि रंगीबेरंगी पदर आहेत. मनोरंजनासोबतच आयुष्याचे गमक मांडणारा हा सिनेमा प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाविषयी विचार करण्यास भाग पाडणारा असून, मुरली नलप्पा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link