Next
शमले आवाजामागचे कुतूहल
BOI
Tuesday, April 18, 2017 | 07:11 PM
15 1 0
Share this article:

पुणे : आंतरराष्ट्रीय आवाज दिनानिमित्त ‘स्रोत संस्था’ आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘आवाज विज्ञानातला आणि संगीतातला’ या प्रदर्शनाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. १७ एप्रिलला शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांच्या मदतीने आवाजामागचे विज्ञान उलगडण्यात आले. घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात हे प्रदर्शन पार पडले.

आवाज कसा निर्माण होतो, स्पंदन म्हणजे काय, आंदोलनाची वाटचाल कशी होते, लहर म्हणजे काय, आवाज कसा पसरतो, मानवी आवाजात विविधता का असते, आवाजाचा प्रतिध्वनी कसा येतो... या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी विविध प्रत्याक्षिके या प्रदर्शनात अनुभवता आली. हे प्रदर्शन संगीताची व विज्ञानाची गोडी वाढवणारे, तसेच फक्त लहानांसाठीच नाही, तर मोठ्यांच्याही ज्ञानात भर पडणारे होते. या वेळी विविध जाणकार आणि तज्ज्ञांनी विज्ञान व आवाजांबद्दल उपस्थितांना असलेले कुतूहल शमवले. 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search