Next
‘अभ्यासेतर उपक्रम मूळ अभ्यासक्रमाइतकेच महत्त्वाचे’
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या उद्घाटनाप्रसंगी प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, December 24, 2018 | 01:10 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘संवाद साधणे, एखादी गोष्ट समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे हे खरे शिक्षण. त्यामुळे आपण ज्याला ‘एक्स्ट्रा करिक्युलर’ अर्थात अभ्यासेतर उपक्रम म्हणतो. तेदेखील मूळ अभ्यासक्रमाइतकेच महत्त्वाचे असायला हवेत,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

मालपाणी फाउंडेशनच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे जावडेकर यांच्या हस्ते नांदे येथे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी गोविंददेव गिरी महाराज, खासदार संजय काकडे, अभिनेता राहुल सोलापूरकर, ध्रुव ग्लोबल स्कूलचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी, मालपाणी समुहाचे राजेश, आशिष, मनीष आणि गिरीश मालपाणी, शाळेच्या प्राचार्या संगीता राऊत आदी या वेळी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, ‘मुले अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून जाऊ नयेत आणि त्यांना खेळ, जीवनकौशल्ये व अनुभव शिक्षणासाठी वेळ मिळावा म्हणून वर्गातील पाठ्यक्रम टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यासाठीच या वर्षी शालेय अभ्यासक्रमात दहा टक्के, पुढील वर्षी वीस टक्के कमी करण्याचा आमचा मानस आहे.’‘सहावी ते बारावीच्या मुलांना आधुनिक विज्ञानाची ओळख करून देण्यासाठी देशातील तीन हजार शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ सुरू करण्यात आल्या आहेत. ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत ११ लाख शाळांना दरवर्षी क्रीडा साहित्य, तसेच ग्रंथालयांसाठीचे साहित्य घेण्यासाठी प्रत्येकी पाच ते २५ हजार रुपये निधी प्रदान करण्यात येत आहे. यापुढे सीबीएसई शाळांना परवानगी देताना संबंधित शाळेची प्रत्यक्ष कामगिरी अर्थात ‘लर्निंग आउटकम’ काय आहे ते प्रामुख्याने तपासले जाईल व शाळेतील इतर सोईसुविधांविषयीचे प्रमाणपत्र जिल्हा नियमन अधिकारी देतील,’ अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मिळणे गरजेचे असून, त्यासाठी सरकारबरोबरच खासगी क्षेत्राचीही भूमिका महत्त्वाची आहे. देशात पहिली ते बारावी या इयत्तांमध्ये २६ कोटी विद्यार्थी शिकतात. त्यातील १३ कोटी विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये आहेत, तर १० कोटी विद्यार्थी खासगी शाळांमध्ये शिकतात. गतवर्षी सरकारी शाळांसाठी ‘स्वच्छ विद्यालय’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात अडीच लाख शाळांनी सहभाग घेतला; परंतु या वर्षी या स्पर्धेत खासगी शाळांनाही सहभागी करून घेतले असून, त्यामुळे सहभागी शाळांची संख्या साडेसहा लाख झाल्याचे जावडेकर यांनी सांगितले.  

डॉ. मालपाणी म्हणाले, ‘ध्रुव ग्लोबल स्कूल ही मालपाणी समुहाची सामाजिक बांधिलकी असून, शिक्षण हा आमच्यासाठी व्यवसाय नाही, तर पुढील पिढीचे भविष्य घडवण्यासाठीची ती गुंतवणूक आहे. ध्रुव ग्लोबल स्कूल ही शाळा मालपाणी समुहातर्फे संगमनेर येथे २००५ पासून चालवली जात आहे. आता पुण्यात नांदे येथेही शाळा सुरू करण्यात आली असून, या सीबीएसई शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधांसह क्रीडा आणि कलाविषयक उपक्रमांसाठीही अत्याधुनिक स्वरूपाच्या सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link