Next
‘एमआयटी टीचर्स लीग’ स्पर्धेमध्ये ६०० स्पर्धकांचा सहभाग
प्रेस रिलीज
Tuesday, April 23, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाविद्यालयीन शिक्षकांनाही आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, या उद्देशाने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित देशातील पहिल्याच ‘टीचर्स लीग’ आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी ६० महाविद्यालयांमधील ६०० शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे.  

२४ ते २९ एप्रिल २०१९ या कालावधीत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मैदानावर या स्पर्धा होणार असून, याचे उद्घाटन बुधवारी (२४ एप्रिल २०१९) संध्याकाळी चार वाजता छत्रपती पुरस्कार विजेती कबड्डीपटू सायली केरीपाळे हिच्या हस्ते होणार आहे. या वेळी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २९ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता होईल. या समारंभाला महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या स्पर्धेत क्रिकेट (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष), थ्रोबॉल (महिला), बॅडमिंटन (पुरुष व महिला) व टेबल टेनिस (पुरुष व महिला) अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. 

या स्पर्धेसाठी करंडक, पदके व रोख रक्कम अशी एकूण तीन लाख ५० हजार रुपयांची बक्षिसे व प्रशस्तीपत्रके दिली जातील. सर्वसाधारण विजेत्या संघाला करंडक व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. प्रत्येक क्रीडा प्रकारांतील विजेता व उपविजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. 

‘एमआयटी डब्लूपीयु’चे प्रोहोस्ट डॉ. श्रीहरी होनवाड, कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे, प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे आणि ‘एमआयटी डब्लूपीयु’चे क्रीडा संचालक डॉ. पी. जी. धनवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

अधिक माहितीसाठी : प्रा. सचिन शिंदे- ९४०४२ ३२७८१, डॉ. ज्ञानेश्वर माने- ९८९८६ ९९५९३ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search