Next
पावसमध्ये होणार शृंगेरीसारखी चंद्रमौलीश्वर पूजा
स्वामी श्री श्री १००८ श्री विधुशेखर भारती महास्वामींची उपस्थिती
BOI
Tuesday, February 05, 2019 | 04:54 PM
15 0 0
Share this article:

स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिररत्नागिरी : ‘शृंगेरी येथील शारदापीठाचे विद्यमान शिष्य स्वामी श्री श्री १००८ श्री विधुशेखर भारती महास्वामींची विजययात्रा पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात येणार आहे. शृंगेरीमध्ये ज्या प्रकारे चंद्रमौलीश्‍वर पूजा होते तशीच पूजा महास्वामी करणार आहेत. महास्वामींचे दर्शनही भाविकांना घेता येणार आहे,’ अशी माहिती समाधी मंदिराचे कार्याध्यक्ष हेमंत देसाई आणि कार्यवाह प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यात्रेचे स्थानिक संयोजन सेवा मंडळ करत आहे. १० ते १२ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चार वेद, सहा शास्त्रे तसेच, वेदांतामध्ये विधुशेखर भारती पारंगत आहेत. परमपूज्य गुरुस्वामी श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांच्याकडे त्यांनी वेदांचे शिक्षण घेतले. ते पीठाचे ३७ वे आचार्य आहेत. गुरुस्वामीजींच्या आदेशानुसार विधुशेखर भारती विजय यात्रेसाठी महाराष्ट्रात आले आहेत.

१० फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता स्वामीजींचे कार्यक्रमस्थळी आगमन होईल. त्यानंतर धुलीपादूकापूजन, सभा, वेदपठण, स्वामीजींचे अनुग्रह भाषण, पुष्पहार समर्पण, असे कार्यक्रम होतील. रात्री ८.३० वाजता वैदिक संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर स्वामींच्या हस्ते चंद्रमौलीश्वर पूजा होईल. ११ फेब्रुवारीला सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत भाविकांसाठी स्वामींचे दर्शन घेता येईल. रात्री ८.३० ते १० या वेळेत स्वामींच्या हस्ते माघ सोमवारनिमित्त विशेष चंद्रमौलीश्वर पूजा होईल. १२ फेब्रुवारीला सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत भाविकांना स्वामींचे दर्शन घेता येईल. भक्तांना गुरुपादुकापूजन, भिक्षावंदन, व समर्पण पूजन, अर्चन आदी सेवा समर्पित करण्याची सुविधा आचार्य पीठाद्वारा कार्यक्रमस्थळी करण्यात आली आहे.

वैदिक संमेलन तीनही दिवस सकाळी नऊ ते १२.३० व दुपारी तीन ते सहा या वेळेत होईल. यामध्ये चारही वेदांचे अध्ययन केलेले महाराष्ट्रातील २०० ब्रह्मवृंद सहभागी होतील. बारा शतकांपूर्वी निर्माण झालेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांच्या अवताराने सनातन वैदिक धर्माची, तसेच अद्वैत तत्वज्ञानाची पुनःस्थापना झाली, अशा परमपूज्य जगद्गुरु आद्यशंकराचार्य स्वामी महाराजांनी धर्मप्रचार कार्याची सुरुवात ज्या पीठाच्या स्थापनेपासून केली आद्यपीठाचे अर्थात दक्षिणाम्ताय शारदापीठाचे आचार्य म्हणजे साक्षात भगवती शारदाम्बा सरस्वती स्वरूप आहेत. स्थापनेपासून श्रृंगेरी पीठाची आचार्य परंपरा आजपर्यंत अविरत अखंडित चालू आहे. पीठास आदर्श सन्यासाश्रमी ज्ञानी उच्चविद्याविभूषित अशी आचार्य परंपरा लाभली आहे. पीठाचे विद्यमान गुरुस्वामी अनंतश्री विभूषित श्री श्री १००८ श्री भारतीतीर्थ महास्वामीजी हे साक्षात सरस्वती स्वरूप आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search