Next
कचरामुक्त वेंगुर्ल्यावर लघुपटाची निर्मिती
BOI
Thursday, November 15, 2018 | 12:52 PM
15 0 0
Share this article:

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे निर्मित ‘वन झीरो झीरो’ लघुपटाचे अनावरण करताना किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक आर. आर. देशपांडे. समवेत रामदास कोकरे,  माधव चंद्रचूड, वीरेंद्र चित्राव, हेमेंद्र बेळे.

पुणे : पर्यावरणाचे महत्त्व चित्रपटांमधून लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे (केव्हीआयएफएफ) यंदा कचरामुक्त वेंगुर्ल्याची यशोगाथा सांगणारा ‘वन झीरो झीरो’ हा लघुपट तयार करण्यात आला आहे. वेंगुर्ल्याचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या संकल्पनेतून झीरो डम्पिंग ग्राउंड ही संकल्पना वेंगुर्ल्यात यशस्वीपणे राबवण्यात आली.  पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या उपस्थितीत किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक आर. आर. देशपांडे यांच्या हस्ते या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. या वेळी महोत्सवाचे संचालक माधव चंद्रचूड, वीरेंद्र चित्राव आणि हेमेंद्र बेळे उपस्थित होते. 

रामदास कोकरे
दापोली नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना रामदास कोकरे यांनी २०१०मध्ये दापोली शहर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त केले. नंतर त्यांनी नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी म्हणजेच वेंगुर्ला, औरंगाबाद, माथेरान आणि कर्जतमध्ये ‘शून्य कचरा अभियान’ (प्लास्टिकमुक्त गाव अभियान) यशस्वी करून दाखवले. रामदास कोकरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार आणि त्यांना मिळालेल्या यशावर हा लघुपट तयार करण्यात आला आहे. सध्या कोकरे कर्जत (जि. रायगड) नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

पर्यावरण संरक्षणासाठी यशस्वी उपक्रम राबवणाऱ्या लोकांच्या यशस्वी कथांवर लघुपट तयार करण्याची कामगिरी ‘केव्हीआयएफएफ’ने गेल्या वर्षीपासून हाती घेतली आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होण्याचा उद्देश त्यामागे आहे. पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, वायू आणि पाण्याशी संबंधित विषय सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवण्याचा ‘केव्हीआयएफएफ’चा हा एक अभिनव प्रयत्न आहे.  


(वेंगुर्ला मॉडेल नेमके कसे आहे, याबद्दल रामदास कोकरे यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर लेख लिहिला आहे. त्याचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा आणि दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search