Next
‘डीकेटीई’मध्ये ओसगाई यांचे व्याख्यान
प्रेस रिलीज
Monday, April 23 | 05:10 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’मध्ये ‘ग्लोबल मार्केटींग व क्रॉस कल्चरल मॅनेजमेंट‘ या विषयावर मार्गदर्शन करताना टोमियो ओसगाई.इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल अ‍ॅंड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारे (आयएसटीई) ‘ग्लोबल मार्केटींग व क्रॉस कल्चरल मॅनेजमेंट‘ या विषयावर जपान येथील फॉर्मर मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ शार्प इंडिया लिमिटेडचे टोमियो ओसगाई यांचे व्याख्यान झाले.
 
या वेळी बोलताना ओसगाई यांनी जपान येथे आयटी क्षेत्रामध्ये बऱ्याच नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने येथील विद्यार्थ्यांनी जपान येथे असणाऱ्या रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ‘गेल्या दशकामध्ये भारत आणि जापान यांच्यातील व्यापार व गुंतवणूक मोठया प्रमाणवर वाढली आहे. याव्दारे येत्या काळात भारत आणि जापान संबंध घनिष्ठ बनण्यास मदत होईल,’ असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

‘येत्या काळात जपानमधील शैक्षणिक संस्थांमार्फत ‘डीकेटीई’मध्ये जॉईंट उपक्रम राबविण्यात येईल व त्या अंतर्गत विविध सेमिनार व वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे; तसेच जापनीज भाषा येथील विद्यार्थ्यांना  शिकविण्यासाठी प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती ओसगाई यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या टीआयटीपी (टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम), सकुरा सायन्स प्रोग्राम बाय ‘जेएसटी’, स्कॉलरशिप बाय ‘जेएसएसओ’ अशा विविध स्कॉलरशिपचा त्यांनी या वेळी उल्लेख केला.

ओसगाई हे शार्प कंपनीच्या सौदी अरेबिया, ‘युएसए’, मेक्सिको, इंग्लड, जपान, भारत अशा जगभरातील विविध युनिटमध्ये कार्यरत होते; तसेच ते अ‍ॅडव्हायजर इन इंडो जपान रिलेशन्ससाठी देखील कार्यरत आहेत. सध्या ते डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.  

या वेळी उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी.‘आयएसटीई’ ही नॅशनल प्रोफेशनल सोसायटी, भारतातील टेक्निकल एज्युकेशनचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत आहे. या अंतर्गत ‘डीकेटीई’मध्ये विविध विषयावर सेमिनार व वर्कशॉपस राबविण्याची परंपरा आहे. ‘डीकेटीई’त ‘ग्लोबल मार्केटिंग व क्रॉस कल्चरल मॅनेजमेंट‘ या विषयावर आयोजित व्याख्यानामधून टोमियो यांनी जपान व भारत यांच्या संस्कृतीतील साम्य व विविधता, याच्यावर भाष्य केले. टोकियो येथे असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळयाचा उल्लेख करीत गणेश, सरस्वती या देवतांना जपानमध्येही पुजले जाते असे नमूद केले; तसेच सर्वधर्मसमभाव व सर्व धर्माचा स्वीकार व त्याचा आदर करण्याची परंपरा जपानमध्ये भारतासारखीच असल्याचे नमूद करतानाच भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेद व योग ही बलस्थाने असल्याचेही ओसगाई म्हणाले.

‘हिरोशीमा, नागासकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतरदेखील आज जपान जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे व याचे कारण म्हणजे जपानी लोकांमध्ये असलेले संघभावना व वेळेचे काटेकोरपणे पालन हे होय. जपानमध्ये विद्यार्थी व शिक्षण मिळून वर्गाची स्वच्छता करतात,’ असे त्यांनी सांगितले. ‘५एस’ व ‘कायझन’ या जपानमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या पद्धतीचा उल्लेख केला.

ओसगाई यांनी पॉप्युलेशन पिरॅमिडद्वारे भारत व जपानमधील लोकसंख्येवर विश्‍लेषण केले व जपानमध्ये वृद्ध लोकांची संख्या तुलनेने जास्त आहे, तर भारतामध्ये १४-२५ वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे, असे नमूद केले.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, संस्थेचे पदाधिकारी यांनी ओसगाई यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलनानंतर पाहुण्यांची ओळख ‘आयएसटीई’चे चेअरमन प्रा. पी. एन. गोरे यांनी केली. ‘डीकेटीई’चे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी प्रास्ताविक केले.  या वेळी डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. वाय. एम. इंडी यांनी केले. १००हून अधिक प्राध्यापकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link