Next
विद्यार्थ्यांसाठी ‘पढेगा भारत’ ही व्हर्च्युअल क्लासरूम सज्ज
अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन
BOI
Wednesday, June 19, 2019 | 05:44 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
शालेय विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशन प्रा.लि. या कंपनीने ‘पढेगा भारत’ नावाने व्हर्च्युअल क्लासरूम उपलब्ध केली आहे.  

‘पढेगा भारत’ आणि ‘चाणक्य मंडल परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने या क्लासरूममधून अविनाश धर्माधिकारी यांनी तयार केलेला राज्यसेवा, लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. तर आठवी ते बारावी इयत्तेतल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय शिकविले जाणार असून, अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी, नीट आणि जेईई  या स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शनही केले जाणार आहे. 


या उपक्रमात नामवंत शिक्षकांचे लेक्चर्स रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात येणार आहेत. 
‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाचा शैक्षणिक कार्यातही चांगला उपयोग व्हावा या हेतूने खासदार अमर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेणू साबळे आणि सम्यक साबळे यांनी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search