Next
‘महाराष्ट्राचे वैभव असलेली वारली कला जतन केली पाहिजे’
वारली आर्ट कार्यशाळेत प्रा. सुधाकर चव्हाण यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, November 27 | 11:47 AM
15 0 0
Share this story



पुणे : ‘आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील निसर्ग, प्राणी, पक्षी, शेती, झोपड्या, झाडे, नदी, पाडा (गाव) याचे प्रतिबिंब वारली कलेत उमटते. त्रिकोण आणि सरळ रेषा या माध्यमातून सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या भिजवलेल्या पिठीतून बांबूच्या काड्यांनी निर्माण होणारी वारली चित्रकला हे महाराष्ट्राचे वैभव आहे आणि ते जतन केले पाहिजे,’ असे प्रतिपादन प्रा. सुधाकर चव्हाण यांनी केले.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या विद्यमाने २५ नोव्हेंबर २०१८ रोजी आदिवासी वारली आर्ट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी वारली कलेचा परिचय करून देताना ते बोलत होते. ही कार्यशाळा सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवन येथे झाली. कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. डहाणू येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वारली कलाकार राजेश वंगाड आणि वारली कलाकार मीनाक्षी वायदा यांनी या कार्यशाळेत प्रात्यक्षिक दाखवले.

भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कलाशिक्षक वामन लेले उपस्थित होते. ‘विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत सुलोचना नातू विद्या मंदिर आणि परांजपे विद्या मंदिरचे शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link