Next
‘यू-ट्यूब’ वापरात भारत ‘नंबर वन’
BOI
Wednesday, April 10, 2019 | 11:37 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारत ही ‘यू-ट्यूब’ची जगातील सर्वांत मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ ठरली आहे. ‘यू-ट्यूब’च्या वापरात भारताने अमेरिकेसह सर्व देशांना मागे टाकले आहे. स्वस्त स्मार्टफोन आणि स्वस्त दरांतील इंटरनेट सुविधा, स्थानिक भाषांतील व्हिडिओंचे वाढणारे प्रमाण, तसेच शिक्षण, आरोग्य, पाककला आणि संगीत अशा वैविध्यपूर्ण प्रकारच्या व्हिडिओंची उपलब्धता ही या वाढीची प्रमुख कारणे आहेत. दर महिन्याला भारतातील २६.५ कोटी वापरकर्ते ‘यू-ट्यूब’वरील व्हिडिओ पाहतात आणि सर्वाधिक वापरकर्ते छोट्या शहरांतील आहेत. 

‘यू-ट्यूब’च्या सीईओ सुसान वोसिकी यांनी ही माहिती दिली. ब्रँडकास्ट या ‘यू-ट्यूब’च्या वार्षिक सोहळ्याकरिता त्या मुंबईत आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. भारतात व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण वाढण्यासाठी इंटरनेटचे कमी झालेले दर कारणीभूत आहेत. सप्टेंबर २०१६मध्ये जिओची सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटचे दर उतरत गेले. सध्या एक जीबी डेटा १० रुपयांहून कमी दरात उपलब्ध असून, दोन-तीन वर्षांपूर्वी त्याचे शुल्क १०० रुपयांच्या आसपास होते. 

इंटरनेट आणि ‘यू-ट्यूब’च्या वापराबद्दलची ताजी आकडेवारी
- २००८मध्ये ‘यू-ट्यूब’ भारतात सुरू झाले, तेव्हा देशभरात केवळ दीड कोटी इंटरनेट ग्राहक होते.

- सध्या दर वर्षी सुमारे चार कोटी नवे वापरकर्ते इंटरनेटवर येतात.

- २०२०पर्यंत भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची एकूण संख्या ५० कोटींवर जाण्याचा अंदाज. त्यांना आपल्याकडे वळविण्याचे ‘यू-ट्यूब’चे लक्ष्य.

- सध्या प्रत्येक महिन्यात ‘यू-ट्यूब’ वापरणाऱ्या भारतीयांची सरासरी संख्या २६.५ कोटी.

- गेल्या वर्षभरात (२०१८) ‘यू-ट्यूब’ मोबाइलवर पाहण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांनी वाढले.

- व्हिडिओ पाहण्याच्या एकूण कालावधीपैकी (वॉच टाइम) ६० टक्के कालावधी सहा मेट्रो शहरे सोडून बाकीच्या छोट्या शहरांतील. 

- म्हणजेच छोट्या शहरांत व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण अधिक.

- सध्या भारतातील १२००हून अधिक ‘यू-ट्यूब’ चॅनेल्सना १० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. 

- पाच वर्षांपूर्वी केवळ १५ भारतीय चॅनेल्सना १० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स होते. 

- स्थानिक भाषांतील व्हिडिओंचे प्रमाण मोठे.

- तंत्रज्ञान, सौंदर्य, आरोग्य, फिटनेस, नृत्य, खाद्यपदार्थ, पर्यटन अशा वैविध्यपूर्ण विषयांतील व्हिडिओंची भारतीय चॅनेल्सकडून निर्मिती. त्यामुळे वापरकर्ते वाढले.

- २०१८मध्ये भारतात ‘शिक्षण’ या विषयातील व्हिडिओ प्रसारित होण्याच्या आणि ते पाहिले जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ. पाहण्याचे प्रमाण दिवसभरात सुमारे एक अब्ज ‘व्ह्यू.’

- मोबाइलवर व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण वाढल्याने जाहिरातदारांसाठी संधी वाढल्या.

- नेमकेपणाने आणि थेट जाहिराती करणे शक्य.

- स्थानिक भाषांतील वापरकर्त्यांचे प्रमाण मोठे असल्याने ‘यू-ट्यूब म्युझिक’ही १० स्थानिक भाषांत सादर करण्यात आले आहे. 

- ‘यू-ट्यूब म्युझिक’ भारतात सादर झाल्यावर एक आठवड्याच्या आतच तीस लाखांहून अधिक जणांनी ते डाउनलोड केले. 

(सकारात्मक विषयांचे, दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search