Next
युवा कलाकारांची रंगणार बैठक
तालयोगी आश्रम संस्थेतर्फे रविवारी मैफलीचे आयोजन
BOI
Tuesday, December 18, 2018 | 05:50 PM
15 0 0
Share this story

गायिका रुचिरा काळे व पखवाजवादक भागवत चव्हाण

पुणे : तालयोगी सुरेश तळवलकर यांच्या तालयोगी आश्रम संस्थेतर्फे बैठक या सुरेल सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सिंहगड रस्त्यावरील व्हर्सटाईल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमात गायनासह वादनाचा सुरेख नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे. यामध्ये रुचिरा काळे यांचे गायन आणि पखवाजवादक भागवत चव्हाण यांचे वादन रसिकांना ऐकता येणार आहे. त्यांना अजिंक्य जोशी यांचे तबल्यावर आणि स्वानंद कुलकर्णी हे संवादिनीवर साथ करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
 
कार्यक्रमाविषयी 
बैठक
स्थळ : व्हर्सटाईल स्कूल, सिंहगड रस्ता 
दिवस व वेळ : रविवार, २३ डिसेंबर, सांयकाळी पाच वाजता. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link