Next
महिला बचत गटांना ‘रंगूनवाला’तर्फे प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Saturday, December 22, 2018 | 01:46 PM
15 0 0
Share this article:



पुणे : भीमथडी 'जत्रेत सहभागी होणाऱ्या ८२ महिला बचत गटांना खाद्य पदार्थांची स्वच्छता, व्यावसायिक नियम, खाद्य परवाने, व्यक्तिमत्व विकास याबाबत शारदानगर आणि पुणे येथे एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले.

अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, मार्गदर्शक अनिता फ्रन्झ, आकाश वाळके, पुनीत बसून यांनी महिला बचत गटांना अन्न परवान्याबाबत माहिती देऊन शासकीय कायदे, अन्न पदार्थांची स्वच्छता, ग्राहक सेवा, व्यक्तिमत्व विकास, ग्राहक वर्तन याबाबत प्रशिक्षण दिले.

पवार म्हणाल्या, ‘कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर त्यातील बारकावे, नियम, अटी समजून व्यावसायिक स्पर्धेत उतरले पाहिजे. कारण दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा खडतर आहे. यासाठी नाविन्यपूर्ण व्यावसायिक माहिती प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.’



भीमथडीची जत्रेची पूर्व तयारी म्हणून गेली १२ वर्षे या जत्रेत सहभागी होणाऱ्या बचत गटांना प्रशिक्षण दिले जात आहे. सहभागी महिला बचत गटांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, पुढील व्यवसायास त्यांना प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याचे आकाश वाळके यांनी सांगितले.

प्रशिक्षण आयोजन आणि हेतू याबाबत प्रकल्प अधिकारी सचिन खलाटे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला विजय कोकाटे, शुभांगी तावरे यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search