Next
पूरग्रस्त आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सिद्धार्थ फाउंडेशनकडून लेखनसाहित्य
BOI
Wednesday, August 21, 2019 | 04:20 PM
15 0 0
Share this article:शहापूर :
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे भातसई-वासिंद (ता. शहापूर, जि. ठाणे) येथील गाडगेमहाराज आश्रमशाळेत पाणी भरले होते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे सर्वच साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वासिंदमधील सिद्धार्थ फाउंडेशनने या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना लेखनसाहित्याचे वाटप केले. 

पहिली ते दहावीपर्यंतच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे ४५० वह्या आणि ४५० पेन्स, तसेच इतर लेखनसाहित्य देण्यात आले. संस्थाचालक भास्कर साठे व मुख्याध्यापक प्रकाश अवघड यांच्याकडे हे साहित्य सुपुर्द करण्यात आले. उपस्थित सर्व संचालकांचे शाळेच्या वतीने पुस्तक व गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापक प्रकाश अवघड यांनी स्वागत केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी केले. या वेळी वासिंद ग्रामपंचायतीच्या सरपंच लता शिंगवे, सदस्य शेळके, सिद्धार्थ फाउंडेशन चे अध्यक्ष वसंत धनगर, सरचिटणीस अशोक गायकवाड, खजिनदार डॉ. रत्नदीप शिवगण, माजी अध्यक्ष जगदीश गायकवाड, वधू-वर सूचक केंद्रप्रमुख प्रकाश कांबळे, उपप्रमुख मच्छिंद्र साळवे, उपप्रमुख बळीराम गायकवाड, वधू-वर केंद्राचे माजी प्रमुख बी. डी. चन्ने, संचालक गुरुनाथ गायकवाड, कैलास खैरनार, जितेंद्र खरे, संस्थाचालक भास्कर साठे, मुख्याध्यापक प्रकाश अवघड, सहशिक्षक पदमाने आणि कर्मचारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search