Next
‘बँकिंग क्षेत्रात अनेक रोजगार संधी’
‘सिंहगड’मध्ये आयोजित व्याख्यानात सौम्या रंजन यांची माहिती
प्रेस रिलीज
Thursday, July 04, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:


कुसगाव : वाणिज्य शाखा ही महत्त्वाची व बहुआयामी अशा प्रकारची व्यक्तिमत्त्व तयार करणारी शाखा म्हणून गणली जाते.  आजमितीस जीएसटी, आयकर, शेअर बाजार अशा विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक ते कौशल्य शिक्षणामध्ये आल्यास विद्यार्थी अधिक समृद्धपणे करियर करू शकतात. वाणिज्य शिक्षणामध्ये कौशल्याचा संपन्नतेने वापर करण्याच्या दृष्टिकोनातून कौशल्य व रोजगार क्षमता यांचा संबंध येतो,’ असे बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस इन्शुरन्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (बीएफएसआय) हेड ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट सौम्या रंजन यांनी सांगितले. 

लोणावळ्यातील निवृत्ती बाबजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स येथे ‘रोजगारक्षम कौशल्य विकास’ यासंबंधी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. स्कीम फॉर हायर एज्युकेशन युथ फॉर अप्रेंटीशीप अँड स्किल (श्रेयस) प्रोग्राम हा मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंटमार्फत चालू करण्यात आला आहे. 


या वेळी संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड आणि एसकेएनएसआयटीचे प्राचार्य डॉ. मिलिंद रोहकले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढवण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत, तसेच सिंहगड संस्थेने गेली अनेक वर्षे चालविलेला स्टुडंट ट्रेनिंग प्रोग्राम (एसटीपी) हा कौशल्य वाढविण्यासाठी कसा उपयोगी आहे याबद्दल मार्गदर्शन केले. 

प्रा. राजेश कंझाडे, समन्वयक ‘श्रेयस’ प्रोग्रामसंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व याद्वारे नोकरीच्या संधी विविध बँकेमध्ये कशा उपलब्ध होऊ शकतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ‘श्रेयस’ प्रोग्रामअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सौम्या रंजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनंत घोळवे यांनी केले. प्रा. डॉ. नितीन जोशी यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suraj Mankar About 78 Days ago
It was awesome Seminar !!!
0
0

Select Language
Share Link
 
Search