Next
गाण्यांमधून प्रकटली मातृत्वाची विविध रूपे
प्रेस रिलीज
Saturday, March 16, 2019 | 03:51 PM
15 0 0
Share this story



पुणे : येथील स. शि. नाईक प्रतिष्ठान आयोजित ‘तू कितनी अच्छी है’ हा मराठी-हिंदी फिल्मी गीतांचा कार्यक्रम १५ मार्च २०१९ रोजी एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केला होता. यात ‘मैया यशोदा’, ‘तुझे सब है पता मेरी माँ’, ‘माँ तू कितनी अच्छी है’ अशा अनेक गीतांतून ‘ती’ची विविध रूपे प्रकटली आणि त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.

या कार्यक्रमादरम्यान पृथ्वीराज या विशेष मुलाचे संगोपन करणाऱ्या दया इंगळे या मातेचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सम्राट नाईक, किशोर सरपोतदार, सुनील पवार, जयश्री नाईक, मीना नाईक, दत्ता उभे हे मान्यवर उपस्थित होते. याच वेळी ‘अपेक्षा’ या महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘सामान्यांना असामान्यांचा सन्मान करण्याची संधी देणारा हा उपक्रम स्तुत्य असून, सामाजिकतेची प्रेरणा सर्वांना देणारा आहे’, अशा भावना किशोर सरपोतदार यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमात पृथ्वीराज इंगळे, सतीश इंगळे, रवींद्र शाळू, प्रशांत नाईक, गौरी कडूसकर, डॉ. माधुरी कश्यप, राजेश्वरी पवार, क्रिशा चिटणीस, चारुलता बेलखडे, बाळकृष्ण कांबळे, ज्योती नालसे, सम्राट नाईक यांनी गायन केले. विजय बोत्रे-पाटील आणि धनश्री तुळपुळे यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link