Next
गौरी सावंत यांच्या तृतीयपंथी मातृत्वाची उलगडली कथा
प्रेस रिलीज
Tuesday, May 15, 2018 | 03:55 PM
15 0 0
Share this article:पुणे : पुणेकर गौरी सावंतचा पुण्यात झालेला सत्कार, गौरी सावंत यांच्या दत्तक मुलगी-भावी जावयासह झालेला सत्कार आणि स्वतःचे दुःख लक्षात आल्यावर समदुःखी तृतीयपंथीयांसाठी हक्कांसाठी गौरी सावंत यांनी दिलेल्या  लढ्याची कथा ऐकून थक्क झालेले पुणेकर अशा वातावरणात जागतिक मातृदिन साजरा झाला.

जागतिक मातृदिनानिमित्त क्रिएटिंग पॉसिबिलीटीज् संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी सामाजिक काम करणार्‍या, सर्वोच्च न्यायालयात लढा देणाऱ्या तसेच मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणार्‍या तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

‘क्रिएटिंग पॉसिबिलीटीज्’चे संस्थापक र्‍हिदम वाघोलीकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सुधीर वाघोलीकर, आशय वाघोलीकर, अनू वाघोलीकर यांच्या हस्ते मातृशिल्प देऊन गौरी सावंत यांचा सत्कार करण्यात आला. सावंत यांची मुलगी यशश्री आणि भावी जावई हितेश वाटवे यांचा सत्कार या कार्यक्रमात झाला.

एलिजियम बँक्वेट्स, घोले रस्ता येथे १३ मे २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘गौरी सावंत- द एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ द फर्स्ट ट्रान्सजेंडर मदर’ हा कार्यक्रम झाला. यात संगीता शेट्ये यांनी सावंत यांची प्रकट मुलाखत घेतली. याच कार्यक्रमात डॉ. सोनिया नगराळे यांनी ‘तृतीयपंथीयांचे कायदेशीर हक्क’ या विषयावर मार्गदर्शन केले.

सावंत म्हणाल्या, ‘मी पुरुष म्हणून जन्माला आले; पण स्त्री सुलभ वागावे, राहावे वाटायचे. किशोरवयातच मला ‘गणपत पाटील’ म्हणून चिडवले जाऊ लागले. घरात कधीही वाढदिवस साजरा झाला नाही. मग मुंबईला पळून गेले. मग मी स्त्री म्हणून अभिव्यक्ती जपत राहिले. अर्धपोटी राहिले. सिग्नलला भीक मागावी लागली. माझी आई ‘विठ्ठल’ माऊली आहे आणि मातृत्व ही अमर भावना आहे. शालेय शिक्षणात नपुसकलिंगी म्हणजे काय विचारले, सांगितले जात नाही. भारतात जेंडर इक्विलिटी अजून नाही. महाराष्ट्रात पुरोगामी विचार असूनही अजून तृतीयपंथीयांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत.’

‘लग्न व्हावे ही माझी ही अपेक्षा होती; पण, लैंगिकता, भूक याच्यापेक्षा जबाबदारी जास्त कळत गेली. मग स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम सुरू झाले. एचआयव्ही झालेल्या महिलेच्या मृत्युनंतर तिच्या पाच वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आणि मातृत्वाचा प्रवास सुरू झाला. २०१४ साली बांगड्या गहाण ठेऊन सर्वोच्च न्यायालयात जेंडर स्टेटस लढ्याची याचिका दाखल केली. २०१४ला पुनर्जन्म झाला आणि तृतीयपंथी म्हणून ओळख मिळाली म्हणून माझे वय आज चार वर्षांचे आहे,’ असे सावंत यांनी सांगितले.

‘चारचौघी’, ‘नानी घर’सारख्या संस्थाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहितीही सावंत यांनी या वेळी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search