Next
‘कचरा व्यवस्थापन, पाणी, प्रदूषणावर ‘झिन्टो’ने काम करावे’
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Tuesday, April 02, 2019 | 06:03 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘उद्याच्या सक्षम भारतासाठी ‘झिन्टो’ने कचरा व्यवस्थापन, पाणी नियोजन, प्रदूषण आणि बाल आरोग्याच्या प्रश्नांवर काम करावे,’ असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात आज (दोन एप्रिल) ‘झिन्टो एक्सचेंज इंडिया २०२०’ परिषद झाली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी बेकर ह्युजेस कंपनीचे चेअरमन लारेन्झो सिमुलेनी, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता, ‘झिन्टो’चे ओसओल्ड बीजलेंड, ‘झिन्टो’च्या भारतातील प्रतिनिधी सुभासिनी चंद्रन, इंडाल्को, सेल इंडिया, टाटा, एसबीआय, सायनंट आदी उद्योग समूहाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य हे देशातील मोठे उद्योग केंद्र असून, देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे औद्योगिक आणि सामाजिक विकास झपाट्याने झाला असून, याकामी तरुणांचा आणि महिलांचा मोठा सहभाग आहे. जगातील अनेक राष्ट्रांच्या तुलनेत भारतात तरुण वर्गांची संख्या जास्त असल्याने विविध क्षेत्रात देश प्रगती पथावर पोहोचला आहे.’

पाणी प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, ‘जगभर पाण्याच्या प्रश्न भेडसावत आहे. त्यासाठी विविध संस्थांनी सरकार आणि अभ्यासकांसोबत काम करून पाण्याचे नियोजन, पाण्याचा शोध आणि वापर या संदर्भात योगदान दिले पाहिजे. तापमान वाढीचा परिणाम पर्यावरणावर झाला असून, त्याचा फटका पाण्याच्या स्रोताला बसला आहे. त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याचे स्रोत शोधून त्यांनी आपली वाटचाल स्वयंपूर्णतेकडे केली पाहिजे. पाणी असेल, तरच उद्योगधंदे वाढतील, समाजाला चांगले आयुष्य जगता येईल. वन्यप्राणी, जंगल, पशू-पक्षी यांच्या संरक्षणासाठी सर्वांनीच पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे.’२०२२साली भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वधर्म समभाव, समता व बंधुत्वाचा गाभा असणारी जगातील मोठी लोकशाही भारतात आहे. याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे. देशाने उद्योग क्षेत्रात आघाडी घेतली असून, परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे महिला आणि तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. विकासासाठी विजेची गरज असून, त्यासाठी १७५ गिगावॅट्सची विजनिर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी भविष्यात अणूऊर्जा, इंधन आणि वायुंचा वापर गरजेचा असल्याचे मत राज्यपालांनी मांडले.

सिकलसेल, ॲनेमिया आणि इतर आजार हे आदिवासी समाजात आढळून येतात. हे सर्व खर्चिक उपचार असल्याने त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘हृदय रोगाचे अचून निदान करणारा आंध्रप्रदेश राज्यातील उपक्रम महत्त्वाचा आहे. तो लवकरच सुरू करण्यात येईल; तसेच प्लास्टिक सफारी प्रोजेक्ट, लहान मुलांना प्लास्टिकचे दुष्परिणामाबाबत सतर्क करणारे उपक्रम सुरू करावेत. झिन्टो ग्रुप व त्यांच्या सहभागी संस्था जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सातत्याने चर्चा घडवून उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजन करीत असतात. त्यांचे हे कार्य अभिनंदनीय आणि प्रेरणा देणारे आहे,’ असे राव यांनी सांगितले.

चेअर ऑफ इंडिया या पदावर पद्‌मभूषण राजर्षी बिर्ला यांची निवड झाल्याबद्दल राव यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search