Next
‘टॉपर’ची ३५ दशलक्ष डॉलर्स निधीची उभारणी
प्रेस रिलीज
Saturday, December 29, 2018 | 03:22 PM
15 0 0
Share this story

मुंबई : शाळेनंतरच्या अभ्यासाचे आघाडीचे अॅप ‘टॉपर’ने निधीच्या सीरिज सी फेरीत ३५ दशलक्ष डॉलर्स इतकी निधी उभारणी केली आहे. या फेरीचे नेतृत्व एट रोड्स व्हेंचर्स, हेलियन व्हेंचर्स, कैझन पीई आणि सैफ पार्टनर्स यांनी केले.

या फेरीत शिक्षणकेंद्रित फंड कैझन पीईने टॉपरच्या वर्तमान गुंतवणूकदारांशी हातमिळवणी केली. अल्टरिया कॅपिटल आणि टाइम्स ग्रुपच्या धोरणात्मक गुंतवणूक शाखा असलेल्या ब्रॅंड कॅपिटलनेदेखील यात सहभाग घेतला. टॉपरने आत्तापर्यंत एकंदर ५८ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी केली आहे. या निधीचा उपयोग सहा दशलक्षपेक्षा जास्त नोंदणीकृत विद्यार्थी असणाऱ्या आपल्या मंचाच्या विस्तारासाठी केला जाणार आहे.

अभ्यास व्यक्तीविशिष्ट बनवण्याचे उद्दिष्ट असलेल्या टॉपरमध्ये देशभरात २९ हजार शिक्षक आहेत. यात प्रश्न, उत्तरे, संकल्पना आणि व्हिडिओजचा समावेश आहे. ‘टॉपर’ या भक्कम इन्फ्रास्ट्रक्चरवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित मशीन लर्निंग अल्गोरिदमचा उपयोग करते, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा मार्ग व्यक्तीविशिष्ट होऊ शकेल.

‘टॉपर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक झिशान हयात म्हणाले, ‘हे नवीन आणि वर्तमान गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेले सीरिज सी फंडिंग आहे. हे आमच्या एंगेजिंग प्रॉडक्ट, भक्कम बिझनेस पाया आणि गुंतवणूकदारांचा आमच्यावरील विश्वास याचे द्योतक आहे. या भांडवलाचा उपयोग ब्रॅंडबाबत जागरूकता, नवीन युझर प्राप्त करण्याची गती आणि प्रसार वाढवण्यासाठी आणि प्रशिक्षण व विकास यासाठी करण्यात येईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link